गौतमी पाटील हे नाव गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. यानंतर तिने माफी मागितली होती. सदैव वादामुळे चर्चेत राहिलेली गौतमी पाटील ही लवकरच चित्रपटात झळकणार आहे. तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? रॅपिड फायर प्रश्नावर गौतमी पाटील म्हणाली, “मला…”

‘घुंगरू’ असे गौतमी पाटीलच्या चित्रपटाचे नाव आहे. गौतमीच्या या चित्रपटाची निर्मिती चिंतामणी सिने क्रिएशन्स प्रस्तुत बाबा गायकवाड आणि अजित केंद्रे यांनी केली आहे. तर संदीप डांगे यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमधून चित्रपटाची कथा ही लावणी कलावंताच्या जीवनावर आधारित असल्याचं दिसून येतं. यात गौतमी पाटीलचा डान्स व कातील अदा पाहायला मिळतात, तसेच थोडे हाणामारीचे दृश्यही दिसत आहेत. टीझर उत्कंठावर्धक आहे.

Video: “तुला लाज वाटत नाही का?” विचित्र ड्रेस घातलेल्या जान्हवी कपूरला नेटकऱ्यांनी सुनावलं, भारतीय संस्कृतीची करून दिली आठवण

‘घुंगरू’ या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच गौतमी पाटील या चित्रपटात एका लावणी कलावंताची भूमिका साकारत आहे. तिच्या आयुष्यात येणाऱ्या अघटित घटनांमुळे नायकाच्या ती प्रेमात पडते. यात राजकारण, थरारदृश्य देखील पाहायला मिळणार आहेत. यामध्ये काही नवीन कलाकारांसर अभिनेत्री उषा चव्हाण यादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दरम्यान, चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असला तरी ट्रेलर व चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil first marathi movie ghungaru teaser released see video hrc