डान्समुळे चर्चेत असलेली गौतमी पाटील आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. वडील लहानपणी सोडून गेल्यानंतर गौतमीला तिच्या आईनेच मोठं केलं. आई आजारी पडली, त्यामुळे पैशांची चणचण भासू लागली. अशातच गौतमीने शाळा सोडली आणि डान्स करायला सुरुवात केली. गौतमी आईची काळजी घेण्यासाठी, तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैसे कमवत असल्याचं सांगते.
लग्नासाठी कसा जोडीदार हवा? गौतमी पाटील म्हणाली, “मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा नको तर…”
गौतमी पाटील एका मुलाखतीत बोलताना म्हणाली, “मी आईसाठीच काम करतेय. कारण मी लग्न करून जाईन, तर तिचं काय होईल, ती कुठे जाणार, तिला कोण सांभाळणार, असे विचार येतात. खरं तर तिला एकटं सोडून मी जाणार नाही, हा विषय वेगळा. अशी वेळ आली तर मी नवऱ्याला सोडेन.”
गौतमी पाटील तिच्या आईच्या खूप जवळ आहे. तिची आईच तिचं विश्व आहे, त्यामुळे तिला सोडून कुठेही जाणार नाही, असं ती म्हणाली.