संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. फक्त देशभरात नाहीतर जगभरात ‘हीरामंडी’ सीरिजविषयी बोललं जात आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत. याशिवाय अभिनेते शेखर सुमन, जेसन शाह, अनुज शर्मा, नसीर खान, अध्ययन सुमन, इंद्रेश मलिक असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले आहेत. १ मेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘हीरामंडी’ सीरिजने ४३ हून अधिक देशातील ‘नेटफ्लिक्स’च्या टॉप १० ट्रेंडिंग यादीत स्थान निर्माण केलं आहे. भारतातील बोलायचं झालं तर, प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यात ‘हीरामंडी’ सीरिज ‘नेटफ्लिक्स’वर सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज आहे.
‘हीरामंडी’ सीरिजमधली गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. प्रत्येक जण ‘हीरामंडी’मधल्या गाण्यांवर आपल्या अदा, नृत्य कौशल सादर करताना दिसत आहेत. अशाच प्रकारे एका मराठी प्रसिद्ध नृत्यांगणा, अभिनेत्रीने ‘चौदहवी शब’ या गाण्यावर मनमोहक अदाकारी केली आहे. तिच्या या अदाकारीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
ही प्रसिद्ध नृत्यांगणा, अभिनेत्री नेहमी आपल्या नृत्याने आणि अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ करत असते. महाराष्ट्रात तर फक्त हिचीच चर्चा असते. कुठलाही समारंभ असो या अभिनेत्रीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आतापर्यंत ही प्रसिद्ध नृत्यांगणा, अभिनेत्री कोण असेल हे लक्षात आलंच असेल. सबसे कातिल गौतमी पाटील हिचा हा व्हिडीओ आहे.
‘हीरामंडी’मधील ‘चौदहवी शब’ गाण्यावर गौतमीने सुंदर अदाकारी केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत ५ लाख २१ हजारांहून अधिक जणांना गौतमीचा हा व्हिडीओ पाहिला आहे. तर ४३ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. प्रतिक्रियांचा तर वर्षाव झाला आहे.
“नवीन लूक छान दिसतो”, “नृत्य व सुंदरतेच्याबाबत तुझा हात कोणी धरू शकत नाही”, “कडक राव…लय भारी”, “क्या बात है”, “तू दिसल्यावर काहीच कळतं नाही”, “सबसे कातिल गौतमी पाटील”, “कसली भारी दिसतेय…खतरनाक”, अशा अनेक प्रतिक्रिया गौतमीच्या या व्हिडीओ चाहत्यांनी दिल्या आहेत.