जिनिलीया आणि रितेश देशमुख यांच्याकडे कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. २००२ पासून हे दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. १० वर्षांच्या डेटिंगनंतर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. आता या जोडप्याला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. जिनिलीयाच्या इन्स्टाग्राम पोस्ट, रील्स व्हिडीओ चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतात. सध्या या जोडप्याने शेअर केलेला असाच एक फोटो आणि त्याला दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे.

फेब्रुवारी महिन्यातील १४ तारीख हा दिवस प्रेमदिन अर्थात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला होता. सामान्य नागरिकांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत हा दिवस मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, रितेश-जिनिलीया इतर जोडप्यांप्रमाणे १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाहीत. या दोघांचा व्हॅलेंटाईन डे १२ फेब्रुवारीला असतो. अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या स्टोरीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.

Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी

हेही वाचा : “श्रेयसची चौकशी करण्यासाठी अक्षय कुमारने रात्रभर…”, दीप्ती तळपदेने केला खुलासा; म्हणाली, “त्या काळात…”

जिनिलीया पती रितेशबरोबरचा फोटो शेअर करत लिहिते, “हा ( १२ फेब्रुवारी) आपला दिवस आहे. दरवर्षी आपण व्हॅलेंटाईन डे दोन दिवस आधी साजरा करतो.” बायकोची स्टोरी रिशेअर करत अभिनेता म्हणतो, “जिनिलीया तुझ्याबरोबर आयुष्य खूप सुंदर आहे…आपल्या प्रेमाची २२ वर्षे”

रितेश-जिनिलीयाची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. १२ फेब्रुवारी २००२ रोजी त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाल्याचं त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे ही लोकप्रिय जोडी १४ ऐवजी १२ तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा करते.

हेही वाचा : शशांक केतकरला मिळाली मोठी संधी! करण जोहरच्या सीरिजमध्ये साकारणार भूमिका; म्हणाला, “त्यांच्या ऑफिसमध्ये…”

genelia deshmukh
रितेश व जिनिलीया देशमुख

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रितेश लवकरच ‘रेड २’ आणि ‘हाऊलफुल्ल ५’ या दोन बहुप्रतिक्षीत चित्रपटांमध्ये झळकणार आहे. याशिवाय जिनिलीया आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Story img Loader