जिनिलीया व रितेश देशमुख यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये रितेश-जिनिलीया एकत्र लोकप्रिय गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी १८ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेता रितेश देशमुखचा ‘अपना सपना मनी मनी’ हा कॉमेडीपट २००६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामधील ‘गिटार साँग’ सर्वत्र लोकप्रिय झालं होतं. आजही प्रत्येक समारंभात “दिल मैं बजी गिटार…” हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. या गाण्याचं मराठी व्हर्जन ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

हेही वाचा : ९० कोटींचं कर्ज, बंगल्यावर जप्ती अन्…; अमिताभ बच्चन यांना कठीण प्रसंगात धीरूभाई अंबानींनी दिलेला मदतीचा हात, पण…

‘श्रीदेवी प्रसन्न’च्या निमित्ताने जवळपास १८ वर्षांनी पुन्हा एकदा सर्वत्र ‘गिटार साँग’ची चर्चा होत असल्याने रितेश देशमुखने देखील या गाण्यावर जिनिलीयासह डान्स करत खास व्हिडीओ शेअर केला आहे. या जोडप्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अवघ्या दोन तासांत रितेशच्या व्हिडीओला २ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहे.

हेही वाचा : व्हॅलेंटाईन डेला साखरपुडा, तर लग्न…; प्रथमेश परबच्या अनोख्या लग्नपत्रिकेने वेधलं लक्ष

दरम्यान, सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना “दिल मैं बजी गिटार…” या मूळ गाण्यांचं मराठी व्हर्जन ऐकायला मिळणार आहे. रितेश-जिनिलीयाने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट करत या दोघांचं कौतुक केलं आहे.

Story img Loader