अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. एक आदर्श जो़डी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. २०२२च्या वर्षाअखेरीस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वेड’ चित्रपटासाठी जिनिलीयाला झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर जिनिलीयाने प्रेक्षकांचे व रितेश देशमुखचे आभार मानले. यावेळी जिनिलीयाने रितेश देशमुखला अहो म्हणून हाक मारली. जिनिलीयाने प्रेमाने मारलेली हाक ऐकून रितेशही लाजला. त्याने मंचावर उभ्या असलेल्या जिनिलीयाला फ्लाइंग किसही दिलं. झी मराठी अवॉर्ड सोहळ्यातील रितेश जिनिलीयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी कर्करोगाशी देतेय झुंज; तुरुंगात असलेल्या पतीसाठी भावनिक पोस्ट, म्हणाल्या “कलियुग…”

हेही वाचा>> जेव्हा इमरान हाश्मीने चांगल्या व वाईट किसबद्दल केलेलं भाष्य, म्हणाला “‘मर्डर’मध्ये मल्लिका शेरावतबरोबर…”

झी मराठीच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत जिनिलीया रितेशला म्हणते “अहो, तुम्ही मला श्रावणी दिली. मी तुम्हाला हे अवॉर्ड दिलं. लव्ह यू”. त्यानंतर रितेश मंचावर जाऊन जिनिलीयाच्या पाया पडतो. रितेश-जिनिलीयाच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

हेही वाचा>>‘बडे मियाँ छोटे मियाँ’ शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत, चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय घडलं?

‘वेड’ चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पाऊल टाकलं. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. मजिली या तामिळ सिनेमाचा हा रिमेक आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia called ritesh deshmukh aho at zee marathi award video viral kak