अभिनेत्री व अभिनेता रितेश देशमुखची पत्नी जिनिलीया देशमुख खूप लोकप्रिय आहे. हे जोडपं गेल्या काही दिवसांपासून त्यांचा मराठी चित्रपट वेडमुळे चर्चेत होते. जिनिलीया ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या कायम संपर्कात असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर काही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. तिने ‘Ask me a Question’ हे सेशन ठेवलं होतं. यामध्ये तिला चाहत्यांनी काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं तिने दिली. यातच एका युजरने तिला कुटुंब आणि काम कसं सांभाळतेस? असा प्रश्न विचारला होता. त्यावर जिनिलीया म्हणाली, “सगळं काम करण्यास इच्छुक असलेल्या हृदयासाठी काहीही अशक्य नाही.”

चाहत्याच्या प्रश्नावर जिनिलीया देशमुखने दिलेलं उत्तर (फोटो – स्क्रीनशॉट)

याशिवाय जिनिलीयाने आणखी काही प्रश्नांची उत्तरं दिली. तिला तिचा आवडता परफ्युम ब्रँड आणि खाद्यपदार्थांबद्दल प्रश्न विचारण्यात आले, त्यालाही जिनिलीयाने मनमोकळेपणानं उत्तरं दिली.

दरम्यान, ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जिनिलीयाने ती गृहिणी असल्याबाबत सांगितलं होतं. ती म्हणाली, “गेल्या दहा वर्षांपासून मी गृहिणी आहे. रितेश, माझी मुलं, रितेशची आई यांच्याबरोबरच मी गेली १० वर्ष आहे. ही मंडळीच माझं आयुष्य आहेत.”