अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख मागच्या काही काळापासून सातत्याने त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधील रितेश व जिनिलीयाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले. तशीच त्यांची खऱ्या आयुष्यातल्या केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडत असते. अनेक ठिकाणी ते दोघं एकत्र हजेरी लावताना दिसतात. तर जिनिलीयाही बऱ्याचदा रितेशबरोबर मराठीतून संवाद साधताना दिसते. आता चक्क तिने रितेशसाठी भर कार्यक्रमात मराठमोळ्या शैलीत उखाणा घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश आणि जिनिलीयाने नुकतीच ‘सकाळ स्वास्थ्यम्’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. तेव्हा ते त्यांच्या नात्याबद्दल भरभरून बोलले. या संवादादरम्यान जिनिलीयाला “आम्हाला तुझ्याकडून एक खास मराठी उखाणा ऐकायला आवडेल,” असं सांगण्यात आलं. त्यावेळी तिने लाजत रितेशसाठी खास उखाणा घेतला आहे.

आणखी वाचा : स्वतःचे चित्रपट फ्लॉप होत असतानाच अक्षय कुमारला हॉलिवूडची भुरळ, ‘अवतार २’चं कौतुक करत म्हणाला…

उखाणा घेण्याच्या या विनंतीला मान देत जिनिलीया लाजत म्हणाली, “तुम्ही माझ्यासोबत असलात की मला स्वतःच्या आधाराची गरज नाही, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, मी दुसरं काही मागत नाही.” तिच्या या उखाण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवत तिला दाद दिली. तर जिनिलीयाचा हा उखाणा ऐकून रितेशही खुश झाला.

हेही वाचा : “जिनिलीयाने नियम केलाय…”; रितेश देशमुखने सांगितलं बायकोबरोबरच्या खास केमिस्ट्रीमागील गुपित

दरम्यान त्यांच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे. तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे. अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia deshmukh expressed her feelings for riteish through marathi ukhana rnv