अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्षित होणार आहे. या चित्रपटातून जिनिलीया मराठी मनोरंजन सृष्टीत पदार्पण करणार आहे, तर रितेश दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरलाही प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. कलाविश्वातील मंडळीही या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. अशातच अभिनेत्री सायली संजीवच्या एका कृतीमुळे जिनिलीयाने तिचे आभार मानले आहेत.

नुकतंच या चित्रपटाचं मुंबईमध्ये एक स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. यावेळी या स्क्रीनिंगला सायली संजीव हिनेही हजेरी लावली होती. चित्रपट पाहून ती खूप भारावली आणि रितेश-जिनिलीया यांचं तिने खूप कौतुक केलं.

आणखी वाचा : “आमची मुलं दरवेळी मीडियाला हात जोडून नमस्कार करतात कारण…” अखेर रितेश-जिनिलीयाने सांगितली यामागची गोष्ट

सोशल मीडियावर सायलीने रितेश-जिनिलीया यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “वेड… या चित्रपटाचं दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय, कॅमेरा, ॲक्शन सीन्स, पार्श्वसंगीत, गाणी आणि या चित्रपटाबद्दलच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मी प्रेमात पडले आहे. ३० डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट नक्की बघा.”

हेही वाचा : “कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

सायली संजीवच्या या पोस्टने जिनिलीयाचं लक्ष वेधून घेतलं. तिने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आणि लिहिलं, “खूप खूप धन्यवाद सायली…” यासोबतच तिने नमस्कार करण्याचा एक इमोजीही पोस्ट केला. जिनिलीयाच्या या उत्तराने सायलीही आनंदी झाली आणि तिने जिनिलीयाची ही स्टोरी रिपोस्ट केली. आता त्या दोघींमध्ये झालेल्या या बॉण्डिंगची सर्वत्र चर्चा आहे.

Story img Loader