Dussehra Celebration: आज सगळीकडे विजयादशमीचा उत्साह आहे. रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्या घरीही दसरा साजरा करण्यात आला. जिनिलीयाने इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये दोन व्हिडीओ पोस्ट करत मुलांनी दसरा कसा साजरा केला त्याची झलक दाखवली.
जिनिलीयाने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडीओत दिसतंय की त्यांच्या घरी काम करणारा तरुण रितेश व जिनिलीयाची मुलं रियान व राहिल या दोघांना सोनं देऊन म्हणजेच आपट्याची पानं देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. ‘हाऊस बॉय रियान व राहिल यांच्याबरोबर पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करताना’, असं कॅप्शन जिनिलीयाने या व्हिडीओला दिलं आहे.
हेही वाचा – ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे, काय करतो? अंकिता वालावलकरच्या होणाऱ्या पतीबद्दल जाणून घ्या
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Video: “तू माझी हिरोईन आहेस”, सूरज चव्हाणला भेटायली आली ‘ती’; नेटकरी म्हणाले, “हीच आमची वहिनी शोभेल”
जिनिलीयाने शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओत रियान व राहिल दोघेही रावण दहन करताना दिसत आहेत. रावणाची प्रिंट असलेला एका व्यक्तीने हातात पकडला आहे, त्या फोटोतील रावणाचे रियान व राहिल मेणबत्तीने दहन करत आहेत. ‘वाईटावर चांगल्याचा विजय, हाच दसऱ्याचा सर्वात मोठा धडा’, असं कॅप्शन तिने व्हिडीओला दिलं आहे. जिनिलीयाने शेअर केलेले हे दोन्ही व्हिडीओ चर्चेत आहेत.
दरम्यान, जिनिलीया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती प्रत्येक सण-उत्सवाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने नवरात्रीतील देवीच्या पूजेचा व्हिडीओ शेअर केला होता.