रितेश देशमुख व जिनिलीया ही लाडकी जोडी ‘वेड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रितेश-जिनिलीयाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांच्याकडे आयडियल कपल म्हणून पाहिलं जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वेड’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रितेश-जिनिलीयाने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. मुलाखतीतील त्यांच्या व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी रितेशने जिनिलीयासाठी उखाणा घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत होता. आता जिनिलीयाने रितेशसाठी घेतलेल्या उखाण्याच्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> ‘तु तेव्हा तशी’ फेम अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल

जिनिलीयाने एका मुलाखतीदरम्यान रितेशसाठी खास उखाणा घेतला. “कोल्हापूरला यायला मी तयार झाले झटकन, रितेशचं नाव घेते तुमच्यासाठी पटकन”, असा मजेशीर उखाणा घेतल्यानंतर जिनिलीया स्वत:चं थोडीशी लाजल्याचं व्हिडीओत दिसत आहे. एका चाहत्याच्या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> के.एल.राहुल व अथिया शेट्टीची लगीनघाई! वेडिंग डेस्टिनेशन पाहून तुम्हीही म्हणाल काय झाडी, काय डोंगर…

रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटाने महाराष्ट्राला ‘वेड’ लावलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट कोटींची कमाई करत आहे. या चित्रपटाने सहा दिवसांत १८ कोटींपेक्षा अधिकचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia deshmukh special ukhana for riteish deshmukh ved pramotion video viral kak