महाराष्ट्राला ‘वेड’ लावणारा रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा मराठी चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवायला सुरुवात केली. तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदोड सुरुच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘वेड’ चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने पडद्यावर तब्बल दहा वर्षांनी कमबॅक केलं आहे. रितेशबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर जिनिलीयाने करिअरमधून ब्रेक घेतला होता. दोन मुलं झाल्यानंतर जिनिलीयाने पुन्हा ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
‘वेड’च्या निमित्ताने जिनिलीयाने अनेक मुलाखती दिल्या. नुकत्याच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयाने तिचं मातृत्व व मुलं याबाबत भाष्य केलं. जिनिलीया म्हणाली, “रितेश जेव्हा पहिल्यांदा श्रावणी ही भूमिका घेऊन माझ्याकडे आला. तेव्हा हे सगळं मला जमेल का? असं मी त्याला विचारलं होतं. तुला या भूमिकेसाठी दुसरी अभिनेत्रीला संधी द्यायची आहे का? कारण मुलांमधून हे सगळं करू शकेन, याबाबत मला खात्री नाही, असं मी त्याला म्हणाले होते. पण तुला मॅनेज करावं लागेल, असं रितेश मला म्हणाला. आज मला वाटतं की मी एक आत्मविश्वासू आणि चांगली आई आहे”.
हेही वाचा>>“आय एम गौरव मोरे…” दुबईतही फिल्टरपाड्याच्या बच्चनची हवा; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला…
“याआधी मी दहा वर्ष २४ तास माझ्या मुलांबरोबर असायचे. ‘वेड’ चित्रपटाच्या शूटिंगमुळे मला बाहेर जावं लागायचं. तेव्हा मी त्यांच्याबरोबर नसायचे. पण आमच्या मुलांनी माझ्या वेळेचा आदर केला. एक पालक म्हणून मुलांनी इतरांच्याही कामाचा, व्यवसायाचा आदर केला पाहिजे, असं मला वाटतं. जर मी आधीसारखीच २४ तास त्यांच्याबरोबर राहिले असते, तर कदाचित त्यांना दुसऱ्या किंवा कामावर जाणाऱ्या महिलांबाबत जाणून घेण्यात अडचणी आल्या असत्या. मी करिअरकडे वळण्याचा निर्णय घेतला. पण अजूनही मला आईपणात जास्त आनंद मिळतो”,असंही जिनिलीया म्हणाली.
रितेश व जिनिलीया यांना दोन मुलं आहेत. त्यांनी त्यांच्या मुलांवर उत्तम संस्कार केले आहेत. अनेकदा मुलांबरोबरचे फोटो व व्हिडीओही ते शेअर करताना दिसतात.