रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. चित्रपट प्रदर्शित होऊन १० ते १२ दिवस उलटले आहेत. तरीही चित्रपटाचा बोलबाला अजूनही कायम आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. तर रितेशचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला. शिवाय जिनिलीयाचाही हा पहिलाच मराठी चित्रपट. तरीही तिने स्वतःला पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून सिद्ध करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण
parveen babi kabir bedi break up story
“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी

पण या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी रितेशच्या समोर अनेक अडचणी आल्या. याबाबतच जिनिलीयाने ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये खुलासा केला आहे. तसेच तिने रितेशचंही तोंडभरून कौतुक केलं आहे.

काय म्हणाली जिनिलीया देशमुख?

“आम्ही जेव्हा या चित्रपटासाठी काम करणं सुरू केलं तेव्हा रितेशचा सिनेमॅटोग्राफर आधीच होता. चित्रपटाच्या चित्रीकरणला तीन आठवडेच बाकी होते. तेव्हाच त्या सिनेमॅटोग्राफरने वैयक्तिक कारणामुळे चित्रपट सोडला. चित्रपटाचा महत्त्वाचा आधाराच निघून गेला तर पुढे काम होणं कठीण असतं.”

आणखी वाचा – “त्याला बोलताही येत नाही” निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या आजाराबाबत दिली माहिती

“पण रितेशने नवोदित सिनेमॅटोग्राफरची चित्रपटासाठी निवड केली. तेव्हा मला कळत नव्हतं की नेमकं काय करायचं? मी रितेशला म्हणाले, तुम्हीपण नवीन आहे सिनेमॅटोग्राफर पण नवीनच. त्यात माझाही पहिलाच मराठी चित्रपट. पण रितेशला मराठी चित्रपट बनवताना कोणत्याच गोष्टीमध्ये तडजोड करायची नव्हती. मी तणावात होते. रितेशचा निर्णय बरोबर तर आहे ना असं मला सतत वाटायचं.” आज या सेलिब्रिटी कपलचा हा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला आहे.