रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा ‘वेड’ चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडे उलटले तरी बॉक्सऑफिसवर ‘वेड’चा बोलबाला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. दरम्यान जिनिलीयाने या चित्रपटामधून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटामधून ती बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर काम करताना दिसली. जिनिलीयाच्या कामाचं सध्या भरभरून कौतुक करण्यात येत आहे. पण दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये ती फक्त घर, संसार सांभळत आहे. याबाबतच तिने आता भाष्य केलं आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जिनिलीयाने ती गृहिणी असल्याबाबत सांगितलं. ती म्हणाली, “गेल्या दहा वर्षांपासून मी गृहिणी आहे. रितेश, माझी मुलं, रितेशची आई यांच्याबरोबरच मी गेली १० वर्ष आहे. ही मंडळीच माझं आयुष्य आहेत.”

आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ

पुढे ती म्हणाली, “पण मी गेली १० वर्ष घरात आहे. गृहिणी आहे त्याचं मला काही वाईट वाटत नाही. मी यामध्येही खूप खुश आहे. जेव्हा मला वाटतं तेव्हा मी बाहेर जाते. माझं आयुष्यच माझ घर आहे.” जिनिलीया तिच्या संपूर्ण कुटुंबालाच तिचं आयुष्य मानते. शिवाय घर, संसार सांभाळण्याकडे तिचा अधिकाधिक भर असतो.