Maharashtracha Favorite Kon 2023 : ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ हा मराठी कलाविश्वात मानात समजला जाणारा पुरस्कार आहे. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्यात मराठी मनोरंजनसृष्टीत उत्तम कामगिरी केलेल्या कलाकारांचा व चित्रपटांचा सन्मान केला जातो. यंदा हा सोहळा १८ फेब्रुवारीला पार पडणार आहे. या सोहळ्याला मृणाल ठाकूर, रितेश-जिनिलीया, महेश मांजरेकर, पूजा सावंत, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत यांसारखे अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहे. नुकताच या सोहळ्याचा प्रोमो ‘झी टॉकीज’ वाहिनीकडून शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्याची कलाविश्वात नेहमीच चर्चा असते. यंदा ‘बाईपण भारी देवा’, ‘वेड’, ‘झिम्मा २’, ‘सुभेदार’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘वाळवी’, ‘नाळ २’, ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटांमध्ये पुरस्कारासाठी चांगलीच चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’मध्ये विशेष करून रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाचा जलवा पाहायला मिळाला.

हेही वाचा : ‘जाऊ बाई गावात’नंतर राणादा दिसणार नव्या भूमिकेत! ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत हार्दिक जोशी पुन्हा घेणार एन्ट्री!

‘वेड’ चित्रपटाने एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. याची खास पोस्ट रितेशने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. याशिवाय नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जिनिलीया खास मराठीत संवाद साधत असल्याचं पाहायला मिळत आहे.

जिनिलीया पुरस्कार स्वीकारताना रितेशला प्रेमाने म्हणते, “अहो! हा पुरस्कार तुमच्यासाठी नाही, तर…आपल्या मुलांसाठी आहे.” पत्नीचं प्रेम व मराठी भाषा ऐकून भर कार्यक्रमात रितेश शिट्ट्या वाजवत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अभिनेत्रीने सुंदर अशी लाल रंगाची नेटची साडी नेसली होती, तर रितेशने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. सध्या या दोघांचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video : साता जन्माचे सोबती! अजिंक्यने लग्नसोहळ्यात सासू-सासऱ्यांचे मानले आभार, पत्नी शिवानी सुर्वेबद्दल म्हणाला…

दरम्यान, रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ (मुंबई फिल्म कंपनी), ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ (रितेश देशमुख), ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (रितेश), ‘सर्वोत्कृष्ट गाणं’ ( सुखं कळले ), ‘सर्वोत्कृष्ट गायक’, ‘सर्वोत्कृष्ट गायिका’, ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चेहरा’ (जिनिलीया), ‘स्टाईल आयकॉन ऑफ द इयर'( रितेश ) अशा नऊ महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia spoke in marathi in award show to impress husband riteish deshmukh deshmukh cute video viral sva 00