बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे. ‘झी स्टुडिओज’ आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत अवताडे यांनी केले आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली. ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या टीमबरोबर साधलेला खास संवाद.

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader