सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाची दिग्दर्शक आतुरतेने वाट पाहत असतात. ‘झुंड’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट नेमका काय असणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती. गेल्यावर्षीच दिवाळीच्या मुहुर्तावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. वेगळं नाव आणि वेगळ्या ढंगात टीझर सादर केल्याने लोकांनी त्याला पसंती दर्शवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटामधील नागराज मंजुळे यांचा लूक अगदी थक्क करणारा आहे. तसेच चित्रपटामधील इतर कलाकारांचे चेहरेही यामध्ये दिसत आहेत. आता मात्रया चित्रपटात प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.हा चित्रपट मार्चच्या अखेरीस प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावरून दिली. पण चाहत्यांना या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक सरप्राइज दिलं आहे.

आणखी वाचा : शाहरुखचा दुर्मिळ व्हिडीओ व्हायरल; गाढवाला बोलायला शिकवणारा, गरीब मुलींशी गप्पा मारणारा किंग खान चर्चेत

झी स्टुडिओजच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याबद्दल एक बातमी शेअर करण्यात आली आहे. या गाण्याचा टीझर नुकताच त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे गाणं उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “व्हॅलेंटाईन्स डेच्या आदल्या दिवशीच प्रेमाचा रंग चढणार, प्रत्येकाचं मन गुनगुननार … प्रेमाची चाहुल देणारं ‘घर, बंदुक, बिरयानी’ या आगामी चित्रपटातलं पहिलं गाणं #गुनगुन येतंय उद्या.” असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

शिवाय या टीझरमध्ये चित्रपटातील अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री सायली पाटील यांची खास झलकही बघायला मिळणार आहे. या टीझरवरून या दोघांमध्ये एक छानशी लव्हस्टोरी बघायला मिळू शकते. या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याने यांना एकत्र स्क्रीन शेअर करताना बघण्याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र नागराज मंजुळे यांनी अजय देवगणच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटामुळे हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghar banduk biryani marathi movie upcoming song teaser akash thosar and sayli patil avn