दिग्दर्शक नागराज मंजुळे आज मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचं नेहमीच लक्ष लागलेलं असतं. सध्या ते त्यांच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना एक खास भेट दिली आहे.
अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री सोनाली पाटील यांची प्रमुख भूमिका असलेला ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. याचबरोबर या चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे हटके भूमिकेत दिसत आहेत तर नागराज मंजुळे यांनी देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. सर्व कलाकारांचा दमदार अभिनय, चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.
कालच हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला. तरी या निमित्त आज या चित्रपटाच्या टीमने चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना तिकिटामध्ये मोठी सवलत दिली आहे. आज म्हणजे शनिवारी हा चित्रपट प्रेक्षकांना फक्त १०० रुपयांत पाहता येणार आहे. आकाश ठोसर याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करत ही बातमी चाहत्यांची शेअर केली.
हेही वाचा : “मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत
आज या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना ही भेट देत आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. या खास ऑफरमुळे प्रेक्षक खूश झाले आहेत. त्यामुळे आता किती प्रेक्षक ही भेट स्वीकारत आज हा चित्रपट पाहणार हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.