मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. त्यांनी आजवर रुपेरी पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. त्यांच्या विनोदी भूमिका तर प्रचंज गाजल्या. आजही अशोक सराफ यांचे चित्रपट सिनेरसिक आवडीने पाहतात. आज त्यांचा ७६वा वाढदिवस आहे. अशोक सराफ यांना चाहते मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

कलाकार मंडळीही अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे रितेश देशमुख. रितेशच्या सुपरहिट ‘वेड’ चित्रपटात अशोक सराफ यांनी काम केलं होतं. ‘वेड’मध्ये अशोक यांनी काम करणं हे रितेशसाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. याबाबत त्याने काही मुलाखतींमध्ये भाष्य केलं होतं.

आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त रितेश याने त्यांच्याबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांच्यासाठी खास संदेशही लिहिला आहे. रितेश म्हणाला, “आतापर्यंतच्या सर्वोत्तम कलाकाराला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. Legend अशोक सराफ”. पुढे रितेशने अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – ना डिझायनर कपडे, ना अवाढव्य खर्च; ऋतुराज गायकवाडच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, साधेपणाने वेधलं लक्ष

तो म्हणाला, “अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं होतं. पण त्यांच्यासाठी दिग्दर्शन करणं म्हणजे एखाद्या ताऱ्याला स्पर्श करण्यासारखंच आहे”. अगदी कमी शब्दांमध्ये रितेशने अशोक सराफ यांच्याबाबत असलेला आदर व्यक्त केला. ‘वेड’साठी त्यांनी काम केलं याबाबत रितेश स्वतःला नशिबवान मानतो.

Story img Loader