मराठीमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये प्रसाद ओकचं नावही आवर्जून घेतलं जातं. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात त्याने साकारलेली आनंद दिघे यांची भूमिका तर प्रचंड गाजली. शिवाय प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रातही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ सारख्या चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं. या गुणी अभिनेता व दिग्दर्शकाचा १७ फेब्रुवारीला वाढदिवस होता.
प्रसाद व त्याची पत्नी मंजिरी ओक यांचे अनेक एकत्रित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे प्रत्येक व्हिडीओ, फोटोंमधून तर दिसून येतंच. पण प्रसाद व मंजिरी एकमेकांबाबत भरभरुन बोलतानाही दिसतात. वाढदिवसानिमित्त प्रसाद-मंजिरी गोव्याला गेले आहेत.
पाहा व्हिडीओ
गोव्याच्या समुद्रकिनारी मंजिरीने प्रसादसाठी खास सरप्राईज ठेवलं होतं. किनाऱ्यावरच तिने खास डेकोरेशन हॉटेलच्या टीमकडून करुन घेतलं. हे पाहून प्रसादही अगदी भारावून गेला होता. व्हिडीओ शेअर करत मंजिरीने म्हटलं की, “वाढदिवसाचं सेलिब्रेशन”. या व्हिडीओ नेटकऱ्यांनी तसेच अनेक सेलिब्रिटी मंडळींनी अधिकाधिक पसंती दर्शवली आहे.
प्रसादला अनेकांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर एकदम मस्त रोमान्स अशी कमेंट अमृता खानविलकरने केली आहे. मंजिरीने शेअर केलेल्या या व्हिडीओला हजारो लाइक आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. तसेच या सेलिब्रिटी कपलचं सोशल मीडियावर कौतुकही होत आहे.