कलाकार मंडळींचं खरं आयुष्य नेमकं कसं आहे? हे जाणून घेण्यामध्ये चाहत्यांना अधिक रस असतो. कलाकारांसह त्यांची मुलंही कायमच चर्चेत असतात. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा मध्यंतरी चर्चेत आला होती. अभिनेत्री सुप्रिया पाठारेचा मुलगा मिहीर पाठारेने ठाण्यामध्ये स्वतःचा फूड ट्रक सुरू केला. आज सुप्रिया पाठारेंच्या वाढदिवसानिमित्त याचबाबत आपण जाणून घेणार आहोत.
सुप्रिया यांनी आजवर मराठी मालिक, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस केलं. अजूनही त्या प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करताना दिसतात. पण सुप्रिया यांच्या मुलाने एक वेगळंच क्षेत्र निवडलं. मिहीर हा एक उत्तम शेफ आहे. त्याने कुठे नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मिहीरने स्वतःचं फूड ट्रक सुरू केलं. आज अनेक खवय्ये त्याच्याकडे विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करतात.
आणखी वाचा – “आज त्याच्याकडे फेम आहे पण…” एमसी स्टॅनच्या वागणुकीवर भडकले पुण्याचे गोल्डन बॉईज, म्हणाले, “गर्व…”
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया यांनी सांगितलं होतं की, “लॉकडाऊनपूर्वी मिहीर अमेरिकेमध्ये होता. तिथे त्याने त्याच्या क्षेत्रामधील शिक्षण घेतलं. त्यानंतर तो भारतात परतला. त्याला स्वतःचं असं काहीतरी सुरू करायचं होतं. म्हणून त्याने त्याच्या मित्रासह फूड ट्रक सुरू करण्याचा निर्णय घेतला”.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
तर मिहीरनेही या मुलाखतीमध्ये नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द होती असं सांगितलं होतं. विशेष म्हणजे स्वतः सुप्रिया चित्रीकरणामधून वेळ काढत लेकाच्या फूड ट्रकवर येतात. तिथे थांबून कामही करतात. आपल्या मुलाने स्वतःचं हॉटेल उभारावं हे सुप्रिया यांचं स्वप्न आहे. पण सध्यातरी मिहीरच्या या फूड ट्रकला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.