तेजस्विनी पंडितने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अलिकडे निर्माती म्हणून तिचा नवा प्रवास सुरु झाला आहे. पण तिचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. अगदी सामान्य कुटुंबामध्ये लहानाची मोठी झालेल्या तेजस्विनीने स्वतःच्या हिंमतीवर कलाक्षेत्रामध्ये अभिनेत्री म्हणून नाव कमावलं. पण या संपूर्ण प्रवासामध्ये तिला काही कठीण प्रसंगांचाही सामना करावा लागला. तेजस्विनीचा आज वाढदिवस आहे. याचनिमित्त तिने सांगितलेल्या एका प्रसंगाबाबत आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही महिन्यांपूर्वी तेजस्विनीची ‘अथांग’ ही वेबसीरिज चर्चेत होती. याच वेबसीरिजनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने एक धक्कादायक खुलासा केला होता. सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये तेजस्विनीने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आलेल्या अनुभवांबाबत भाष्य केलं होतं. यावेळी एका नगरसेवकाने तिला दिलेल्या वागणुकीबाबत तेजस्विनीने खुलासा केला.

आणखी वाचा – “परवा रात्री माझ्यावर चार गुंडांनी हल्ला केला आणि…” संकर्षण कऱ्हाडेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “मी त्यांच्याशी…”

ती म्हणाली, “मी सिंहगड रोडला राहायचे. तेव्हा सिंहगड रोड येथील नगरसेवकाच्या एका घरी मी भाड्याने राहत होते. घर भाडं देण्यासाठी त्या नगरसेवकाच्या मी ऑफिसला गेले होते. तेव्हा मला असं कळालं की, या लोकांचा आपल्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोनच वेगळा असतो. कारण एक आंबा नासका निघाला की बाकी सगळे नासके आहेत असं म्हटलं जातं. किंवा दुसरे आंबे नासके आहेत का? हे बघितलं जातं.”

आणखी वाचा – Video : प्रसाद ओकबरोबर परदेशात काय घडलं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक, अभिनेता म्हणतो, “जगाच्या कानाकोपऱ्यात…”

“मी घरभाडं द्यायला गेले आणि त्या व्यक्तीने मला थेट ऑफर केली. २००९ व २०१०च्या दरम्यान ही घटना घडली. त्याने जेव्हा मला ऑफर केली त्याक्षणी माझ्या समोर फक्त एक पाण्याचा ग्लास होता. मी तेच ग्लासातलं पाणी त्या व्यक्तीच्या तोंडावर फेकलं. मी अशा गोष्टी करायला येथे आली नाही. अन्यथा मी भाड्याने राहिले नसते. कलाक्षेत्रामध्ये मला अशाच पद्धतीने पैसे कमवायचे असते तर मी गाड्या, घर असं काय काय खरेदी केलं असतं. तुमची परिस्थिती तसेच तुम्ही कलाक्षेत्रात काम करत आहात हे पाहून तुम्हाला अशाप्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात”. तेजस्विनीने त्या नगरसेवकाला चांगलाच धडा शिकवला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday tejaswini pandit actress talk about her struggle in industry see details kmd