मराठीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील चित्रपटगृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या घटनेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि प्रेक्षक यांच्यात हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या घटनेवरून मनसे आक्रमक झाली असून त्यांनी या घटनेवर टीका केली आहे. घडलेल्या प्रकारावर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. ते असं म्हणाले “आम्हाला सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटासाठी परवानगी मिळाली आहे. आम्ही ऐतिहासिक पुरावे बोर्डाला दाखवून त्यांच्या परवानगीने हा चित्रपट बनवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाच्याबाबतीत अशी घटना घडणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. ज्या लोकांनी प्रेक्षकांना मारहाण केली त्यांनी माफी मागावी. ज्या शिवाजी महाराजांचे भक्त म्हणून समजतो, ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र आणलं, त्यांना माणुसकीचा संदेश दिला. तेव्हाच आपण एकमेकांसमोर जाऊन एखाद्या कुटुंब प्रमुखाला मारहाण करतो हा खरं तर छत्रपतींचा अपमान करतो आहोत. म्हणूनच मारहाण करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची, छत्रपतींची जाहीर माफी मागावी.” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पत्रकार परिषदेत त्यांनी ज्या ऐतिहासिक संदर्भांवरून हा चित्रपट तयार केला आहे त्याचा उल्लेखदेखील केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले “चित्रपटाच्या बाबतची आमची भूमिका आम्ही मांडणार आहोत.”

article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा
What does the Hema committee report say about the casting couch in Malayalam cinema
मल्याळी चित्रपटसृष्टीतही ‘कास्टिंग काऊच’? काय सांगतो न्या. हेमा समिती अहवाल?
Aishwarya Rai Salman Khan in josh
सलमान खान ‘या’ चित्रपटात ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारणार होता, पण…; अभिनेत्रीनेच सांगितलेला किस्सा
Death anniversary of film industry actor director singer M Vinayak
मला उमगलेले माझे दादा!

‘हर हर महादेव’वरुन वाद : “प्रेक्षकांना मारहाण करणं ही कुठली संस्कृती?”; मनसेचा आव्हाडांना सवाल

दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी त्यांनी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अनेक वर्ष ते मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. दिग्दर्शनाच्या आधी त्यांनी पटकथा आणि चित्रपटांचे संकलन केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत.

हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने २.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.