मराठीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपटांची चलती आहे. गेल्या काही दिवसांपासून तर अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. काही तासांमध्येच या ट्रेलरला लाखो लोकांची पसंती मिळाली. मराठीमधील सुप्रसिद्ध चेहरे या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. त्यापैकीच आणखी एका टॉपच्या अभिनेत्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेते शरद पोंक्षे ‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांची काही सेकंदाची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. शरद पोंक्षे यांचा नवा लूक या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. शिवाय ऐतिहासिक चित्रपटामध्ये त्यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Kishkindha Kaandam OTT Release
फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
Democracy media What the audience expects from the media
प्रसारमाध्यमे खरे प्रश्न मांडणार, की आक्रस्ताळ्या चर्चाच दाखवत राहणार?
tom cruise mission impossible 8 teaser released
Video : खोल समुद्रातील मिशन अन् जबरदस्त अ‍ॅक्शन; टॉम क्रूझच्या ‘Mission Impossible 8’ चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली

पाहा ट्रेलर

“पान सुपारीचीही उसंत ठेवली नाही त्या शिवाजीनं अन् म्हणतोय कसा स्वराज्यात सामिल व्हा नाहीतर मरा” या संवादाने चित्रपटाच्या ट्रेलरला सुरुवात होते. या संवादानंतर “मग आता आम्ही कसं काय वाचवू शकणार तुम्हाला…” असा शरद पोंक्षे यांच्या तोंडी संवाद ऐकायला मिळत आहे. काही सेकंदाची ही झलक पण शरद पोंक्षे यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – “…पण शिवाजी पुन्हा होणे नाही” बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटाला तगडी टक्कर देणारा ‘हर हर महादेव’चा ट्रेलर प्रदर्शित

अभिजित देशपांडे लिखित दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सुबोधसह अमृता खानविलकर, हार्दिक जोशी, शरद केळकर मुख्य भूमिकेत काम करताना दिसतील. शरद या चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. २५ ऑक्टोबरला मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू व कन्नड या पाच भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल.