छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे अक्षया देवधर व हार्दिक जोशी. या दोघांना खऱ्या आयुष्यातही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी २ डिसेंबरला अक्षया व हार्दिकने लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. या दोघांच्या शाही विवाहसोहळ्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. आता दोघंही आपल्या कामामध्ये व्यग्र झाले आहेत. दरम्यान हार्दिकने सोशल मीडियाद्वारे शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा – …तरच करीना कपूर खानचा लेक रात्रीचं जेवण जेवतो, २ वर्षांच्या जेहबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली…
हार्दिक सध्या महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचं चित्रीकरणासाठी तो मुंबईबाहेर आहे. यादरम्यानचे काही फोटोही त्याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले होते. आता त्याने चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अक्षयालाही कमेंट करण्याचा मोह आवरला नाही.
हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो एका गड किल्ल्यावर असल्याचं दिसत आहे. सुर्योदय होत असताना सुर्याला नमस्कार करताना तो दिसत आहे. तसेच यावेळी त्याचा शर्टलेस लूक दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने “हर हर महादेव” असं म्हटलं आहे. त्याच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी अधिकाधिक पसंती दर्शवली आहे.
तर अक्षयानेही त्याचा हा नवा लूक पाहून कमेंट केली आहे. तिने हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. हार्दिक वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये मल्हारी लोखंडे ही ऐतिहासिक भूमिका साकारत आहे. या ऐतिहासिक चित्रपटामध्ये मराठीतील सुप्रसिद्ध कलाकार काम करताना दिसणार आहेत. तर अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसेल.