‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अक्षय कुमारचा या चित्रपटातील फर्स्ट लूकचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. या लूकवरुन नेटकरी त्याला ट्रोलही करत आहेत. आता अभिनेता हार्दिक जोशीने अक्षय कुमारचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने इमोजी टाकत अक्षय कुमारचं कौतुकही केलं आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात हार्दिकही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मल्हारी लोखंडे’ हे पात्र तो साकारणार आहे.

हेही वाचा>> सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पुन्हा प्रेमात पडली रिया चक्रवर्ती; ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

हेही वाचा>>लग्नानंतर रात्रीच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटला घेऊन गेला अन्…; फोटो व्हायरल

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ याआधी हार्दिक ‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटातही झळकला होता. या चित्रपटात त्याने आबाजी विश्वनाथ ही भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तो ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हेही वाचा>> Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान हार्दिक जोशी अभिनेत्री अक्षया देवधरसह नुकताच विवाहबंधनात अडकला. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. राणादा-पाठकबाई या रील लाइफ जोडीला खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकलेले पाहून चाहतेही खूश आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardeek joshi shared akshay kumar video of chhatrapati shivaji maharaj vedat marathe veer daudale saat kak