Hashtag Tadev Lagnam : तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीला अनेक दमदार आणि हिट चित्रपट दिले आहेत. अशात आता ही जोडी पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. लवकरच शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. त्यामध्ये लग्न आणि त्यावर आताच्या आधुनिक पिढीचा वेगळा दृष्टीकोन कसा आहे हे दिसत आहे.

टीझरवरून सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान असे दोघेही या चित्रपटातील मुख्य भूमिकांत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. दोन मध्यमवर्गीय घरांतील तरुण आणि तरुणीच्या लग्नाची लगबग सुरू आहे. कुटुंबीयांच्या सांगण्यावरून दोघेही एकमेकांना पहिल्यांदाच भेटतात. भेटताना दोघांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. भेटीनंतर दोघांच्याही मनात एकमेकांच्या वयाचा प्रश्न निर्माण होतो. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानच्या मनातील हे संवाद फारच मजेशीर आहेत. टीझरमध्ये दोघांची केमेस्ट्री खुलून दिसत आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या टीझरला, “लग्नाआधीची पहिली भेट, थोडीशी लेट, पण झालीय मात्र एकदम थेट.” अशी कॅप्शन लिहिलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांच्यासह प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

आनंद दिलीप गोखले यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे; तर शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत. तर निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत. दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी चित्रपटाविषयी म्हटलं, “हा चित्रपट आजच्या काळातील लग्न आणि नातेसंबंधांच्या बदलत्या संकल्पनेवर आधारित आहे. आत्ताच्या पिढीच्या विचारसरणीत मोठा बदल झाला असून हाच विचार चित्रपटात मांडला आहे.” तसेच प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल अशी आशा आनंद दिलीप गोखले यांनी व्यक्त केली आहे.

तर चित्रपटाचे निर्माते यावर म्हणतात, ” हा चित्रपट आजच्या काळाचा असून तो संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा आहे. काळानुसार तरुणांची विचारसरणी बदलत चालली असून त्यामागे त्यांची काही ठोस कारणे आहेत. तरुणाईचे हेच विचार यात मांडण्यात आले आहे. आपल्यापैकी अनेकांना हा चित्रपट आपल्या जवळचा वाटेल.” २० डिसेंबरपासून ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई! होणाऱ्या पत्नीसह केलं प्री-वेडिंग शूट, हळदीला सुरुवात; फोटो आले समोर

अभिनेत्री तेजश्री प्रधानने आजवर मराठी मनोरंजन विश्वात अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेने तिला घराघरात पोहचवले. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. सध्या ती प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करतेय. तेजश्रीचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट सुद्धा सुपरहिट ठरला होता.

u

तर सुबोध भावेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानेदेखील सिनेविश्वात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अभिनयाच्या जोरावर त्याने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटाबरोबर तो ‘संगीत मानापानाचा’ आणि ‘बोल राणी बोल’ या आगामी चित्रपटांमध्येदेखील झळकणार आहे.

Story img Loader