Hemal Ingle Engagement : यंदाच्या वर्षात पूजा सावंत, शिवानी सुर्वे, तितीक्षा तावडे, योगिता चव्हाण अशा बऱ्याच अभिनेत्रींनी वैयक्तिक आयुष्यात एका नव्या इनिंगला सुरुवात केली अन् त्या लग्नबंधनात अडकल्या. आता लवकरच मराठी कलाविश्वातील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे हेमल इंगळे. तिने नुकताच तिच्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामुळे हेमल इंगळे ( Hemal Ingle ) घराघरांत लोकप्रिय झाली. या चित्रपटात तिने अभिनय बेर्डेबरोबर स्क्रीन शेअर केली होती. सध्या हेमल तिच्या आगामी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये अभिनेत्रीला दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय यामध्ये हेमलच्या जोडीला मराठी कलाविश्वाचा प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशीने स्क्रीन शेअर केली आहे. नेहमीच व्यावसायिक कामांमुळे चर्चेत असणाऱ्या हेमलने तिच्या चाहत्यांना साखरपुड्याचा फोटो शेअर करत सुखद दिला आहे.

हेही वाचा : Navari Mile Hitlerla: लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौर कार्यक्रमात लीलाने घेतला भन्नाट उखाणा, म्हणाली, “आजी एजेंचं नाव घेऊन वचन देते…”

अभिनेत्री हेमल इंगळेचा साखरपुडा

आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ‘एक्स बॉयफ्रेंड’ म्हणत हेमलने ( Hemal Ingle ) इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस, गळ्यात छानसा नेकलेस असा लूक करत अभिनेत्रीने आयुष्याच्या या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. हेमलच्या नवऱ्याचं नाव रोनक असं आहे. होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा रोमँटिक फोटो शेअर करत अभिनेत्रीने साखरपुड्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. हेमल इंगळेने शेअर केलेल्या फोटोवर सध्या नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : Video : युरोपहून एका महिन्याची सुट्टी एन्जॉय करून परतले पतौडी कुटुंब, धाकट्या लेकाबरोबर मस्ती करताना दिसला सैफ अली खान

हेही वाचा : Quiz : ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचे चाहते असाल तर हे क्विझ खास तुमच्यासाठीच…; द्या ‘या’ १० प्रश्नांची अचूक उत्तरं

नवरा माझा नवसाचा २ फेम अभिनेत्री ( फोटो सौजन्य : Hemal Ingle )

श्रिया पिळगांवकर, सौरभ चौघुले, रिंकू राजगुरु, फुलवा खामकर या कलाकारांनी हेमलच्या फोटोवर कमेंट्स करत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अभिनेत्रीच्या चाहत्यांनी सुद्धा या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, तिच्या आगामी ‘नवरा माझा नवसाचा २’ या सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemal ingale navra maza navsacha 2 fame actress shared engagement photo on instagram sva 00