Marathi Actress Hemal Ingle Wedding : ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री हेमल इंगळे घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या सहज सुंदर अभिनयाने अल्पावधीतच हेमलने सर्वांचं मन जिंकून घेतलं. इंडस्ट्रीत यश मिळवल्यावर आता वैयक्तिक आयुष्यात हेमलने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने रौनक चोरडियाशी लग्नगाठ बांधली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हेमल आणि रौनक एकमेकांना डेट करत आहेत. यांच्या लग्नसोहळ्याचा पहिला फोटो आता सर्वांसमोर आलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमलच्या ( Hemal Ingle ) घरी गेल्या अनेक दिवसांपासून लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. या जोडप्याचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता. यानंतर अभिनेत्रीचं केळवण, मेहंदी आणि हळदी समारंभ पार पडला होता. लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर आज हे जोडपं विवाहबंधनात अडकलं आहे. हेमल इंगळेने लग्नात गुलाबी रंगाचा भरजरी लेहेंगा घातला होता. मोकळे केस, सुंदर लेहेंगा, गळ्यात नेकलेस, हातात चुडा या लूकमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत होती. तर हेमलच्या नवऱ्याने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. सध्या संपूर्ण सिनेविश्वातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : ठरलं! ‘स्त्री २’ अन् ‘मुंज्या’चा पुढचा भाग येणार…; ‘मॅडॉक फिल्म्स’ने केली तब्बल ८ चित्रपटांची घोषणा, श्रद्धा कपूर म्हणाली…

हेमल इंगळे व रौनकचा शाही विवाहसोहळा

साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल ( Hemal Ingle ) आणि रौनक यांनी लग्नगाठ बांधली आहे. रौनक हा कलाविश्वापासून दूर असून त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. तो शिक्षणासाठी काही वर्षे युकेमध्ये होता. २०१७ मध्ये रौनक पुन्हा भारतात परतला यावेळीच या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पुढे, यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. रौनक कोल्हापुरचा असल्याने दोघांचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. त्यामुळे या सगळ्या प्रवासात रौनकच्या पाठिंब्यामुळे अनेक गोष्टी सोयीच्या झाल्या असंही हेमल सांगते. जवळपास साडेसात वर्षे एकमेकांना डेट केल्यावर आज हे जोडपं लग्नबंधनात अडकलं आहे.

हेही वाचा : मराठी अभिनेत्रीची यशोगाथा! जागतिक पातळीवर करतेय देशाचं प्रतिनिधित्व, ‘कार रेसर’ म्हणून मिळवली ओळख, जाणून घ्या…

दरम्यान, हेमल इंगळेच्या ( Hemal Ingle ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांच्या ऑनस्क्रीन मुलीच्या भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा सुपरहिट ठरला. यामध्ये अभिनेत्रीने स्वप्नील जोशीसह स्क्रीन शेअर केली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemal ingle marathi actress wedding tie knot with long time boyfriend photo viral sva 00