Marathi Actress Hemal Ingle : ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामुळे हेमल इंगळे घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या अभिनेत्री तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या काही दिवसांतच ती लग्नबंधनात अडकणार आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात हेमलचा साखरपुडा पार पडला होता. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव रौनक चोरडिया असं आहे. अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यावर तिच्या सगळ्याच चाहत्यांना सुखद धक्का बसला. रौनक नेमका कोण आहे, तो काय करतो? याबद्दल अनेकांना प्रश्न पडला होता. अखेर नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याचा खुलासा केला आहे.

साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल आणि रौनक लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगताना रौनक सुरुवातीला म्हणाला, “या सगळ्याची सुरुवात ऑगस्ट २०१७ मध्ये झाली होती. मी तेव्हा युकेला शिकायला होतो… २०१७ मध्ये त्या दरम्यान मी नुकताच भारतात परतलो होतो. हेमल आणि मी एकाच शाळेत होतो ( इयत्ता नववीपासून ) त्यामुळे भारतात आल्यावर सगळ्या मित्रांना भेटायचं ठरलं. आम्ही सगळे फ्रेंड्स एकमेकांना भेटलो त्यावेळी हेमल आणि माझं बोलणं झालं होतं.”

R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Mika Singh angry because Anant Ambani did not gift him 2 crore
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Reshma Shinde Wedding Video
“Six Plus…”, रेश्मा शिंदेच्या साऊथ इंडियन नवऱ्याने लग्नात घेतला इंग्रजीत हटके उखाणा! व्हिडीओ आला समोर

हेही वाचा : अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?

हेमल याबद्दल म्हणाली, “आमचा शाळेचा १३ लोकांचा ग्रुप आहे. आम्ही एकत्र खूप फिरलो वगैरे आहे. पण, आमचं असं बोलणं झालेलं नव्हतं. जेव्हा रौनक युकेवरून परत आला तेव्हाच आमच्यात बोलणं झालं.” रौनक चोरडिया मारवाडी असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे.

हेमल पुढे म्हणाली, “रौनक युकेवरून आल्यावर आमच्यात बोलणं झालं, त्याआधी तो इतकं बोलत असेल हे मला माहिती सुद्धा नव्हतं. हळुहळू मग आमच्यात आणखी मैत्री होऊन डेटिंगची सुरुवात झाली.” आता जवळपास साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. रौनक कोल्हापुरचा असल्याने दोघांचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. त्यामुळे या सगळ्या प्रवासात रौनकच्या पाठिंब्यामुळे अनेक गोष्टी सोयीच्या झाल्या असंही तिने सांगितलं.

हेही वाचा : Bigg Boss चा बंगला! सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; दाखवली पहिली झलक, नेटकरी म्हणाले, “कष्टाचं…”

हेही वाचा : अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”

दरम्यान, हेमल इंगळेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांच्या ऑनस्क्रीन मुलीच्या भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा सुपरहिट ठरला. यामध्ये अभिनेत्रीने स्वप्नील जोशीसह स्क्रीन शेअर केली होती.

Story img Loader