राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांना ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागीरथी’ (गं.भा.) हा शब्द वापरण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. लोढा यांच्या या निर्देशानंतर राजकीय क्षेत्रातील मंडळींनी विविध प्रतिक्रिया दिल्या. यामुळे ‘गंगा भागीरथी/गंभा’ हा शब्द चर्चेत आला आहे. आता या प्रकरणावरुन सुप्रसिद्धी मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने आपलं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गंगा भागीरथी’ हा विधवा महिलांसाठी शब्द वापरल्यानंतर समाजामध्ये त्यांना खरंच सन्मानाने वागवण्यात येणार का? हादेखील प्रश्नच आहे. सोशल मीडियाद्वारे यावरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तर हेमांगीनेही फेसबुक अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत या प्रकरणाबाबत प्रश्न विचारला आहे. हेमांगीने पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – “तुझ्यापेक्षा जिनिलीया…” विलासराव देशमुख यांना होतं सूनेचं कौतुक, रितेश देशमुखने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “आज ते असते तर…”

काय म्हणाली हेमांगी कवी?

“आता विधवेला ’गंगा भागीरथी’ संबोधून आदर/सन्मान देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. असं संबोधल्यामुळे नक्की काय फरक पडेल किंवा काय बदल होतील कुणी मला नीट समजावून सांगेल का? त.टी – हा टिंगल- टवाळीचा विषय नाही. मी प्रामाणिकपणे विचारतेय याची मंडळाने नोंद घ्यावी”. असं हेमांगीने म्हटलं आहे.

आणखी वाचा – CSKच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडवरुन कमेंट करणाऱ्यांना सायली संजीवचं उत्तर, म्हणाली, “त्याचं जेव्हा लग्न होईल तेव्हा…”

हेमांगीच्या या पोस्टनंतर एका नेटकऱ्याने म्हटलं की, ही पद्धत आमच्याकडे गेली चार पिढ्या आहे. आमच्या पणजीला गं.भा. संबोधलं जायचं. यावर हेमांगीने उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “फरक, बदल, नुकसान, फायदा काय झालं? समजा तसं संबोधलं नसतं तर पणजीला प्रेम, माया, दया, सहानूभुती, आदर यातलं काही मिळालं नसतं का?”. तर अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.