मराठीमध्ये उत्तमोत्तम काम करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये हेमांगी कवीचं नावही पुढे आहे. बेधडक वक्तव्य तसेच आपलं मत स्पष्टपणे मांडण्यात हेमांगी सरस आहे. सोशल मीडियाद्वारे ती प्रत्येक विषयांवर व्यक्त होताना दिसते. आता तिने अभिनयक्षेत्रात काम करण्याबाबत भाष्य केलं आहे. अभिनयक्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती अधिकाधिक पैसे कमावते असा अनेकांचं मत असतं. याबाबतच हेमांगीने एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कामध्ये कसं राहायचं? हे हेमांगी कवीला अचूक ठाऊक आहे. म्हणूनच या माध्यमातून ती सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. हेमांगी ज्या इमारतीमध्ये राहते त्या इमारतीमधील लोकांना तिच्याबाबत काय वाटतं हे तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं.

हेमांगीचा हा रिल व्हिडीओ आहे. यामध्ये तिने म्हटलं की, “माझ्या इमारतीमधील लोक असा विचार करतात की मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे…” पैसे, पैसे असं म्हणत ती ५०० रुपयांच्या नोटा घेऊन नाचताना दिसत आहे. ती अभिनयक्षेत्रात काम करत आहे हे पाहून ती चांगले पैसे कमावते असं तिच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना वाटतं हे तिने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं.

आणखी वाचा – Video : …अन् मृणाल कुलकर्णी यांच्या लेकाने चक्क ताज हॉटेलमध्ये बायकोला दिलं वाढदिवसाचं सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे अधिक पैसे मिळतात असं लोकांना वाटत असलं तरी सत्य काही वेगळंच आहे असंही हेमांगीने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. काही सेलिब्रिटी मंडळींनीही हे अगदी बरोबर असल्याचं कमेंट्सच्या माध्यमातून म्हटलं आहे. तसेच तिच्या चाहत्यांनाही तिचा हा व्हिडीओ पसंतीस पडला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemangi kavi share video on instagram talk about working in the entertainment business see details kmd