‘झिम्मा’ हा चित्रपट करोना काळानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आणि या चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा २’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. आजच या चित्रपटाचा एक गमतीदार टीझर प्रदर्शित करून या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

‘झिम्मा’ या चित्रपटात सर्व बायका लंडनच्या टूरला जातात असं दाखवलं होतं. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका सकरल्या होत्या. या सर्वांची कामं, चित्रपटाची कथा, संवाद हे सर्वच प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. तर आता त्यापाठोपाठ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा एक मजेदार अनाऊन्समेंट व्हिडीओ आज प्रदर्शित करण्यात आला आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tharala Tar Mag Maha Episode Promo Out Arjun Propose to sayali
Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो
ott new release Freedom at Midnight - SonyLIV Deadpool & Wolverine
या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

आणखी वाचा : “बायकांनी काहीतरी…” अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या व्हिडीओत निर्मला (निर्मिती सावंत) पुन्हा एकदा फिरायला जाण्यासाठी साहेबांकडे (अनंत जोग यांच्याकडे) परवानगी मागताना दिसत आहेत. यावेळी साहेबांनीही ट्रीपला येण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना नकार देत, पुन्हा एकदा ‘बाया बायाच’ ट्रीपला जायची तयारी करत असल्याचं निर्मला समजावते. साहेब मात्र निर्मलाला सूनबाईंना बरोबर घेऊन जा, असं सांगतात… आता सूनबाई कोण? यावेळी ही ट्रीप कुठे जाणार आणि यात केवळ ‘त्याच’ मैत्रिणी असणार की, आणखी मैत्रिणींची भर पडणार? हे लवकरच कळणार आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “‘झिम्मा’वर प्रेक्षकांशी भरभरून प्रेम केले. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे प्लॅन्स केले. ‘झिम्मा’ सर्वांनाच खूप जवळचा वाटला. आजही मी कुठे गेल्यावर मला अनेक जणी ‘झिम्मा’ आवडल्याचे आवर्जून सांगतात. अनेकींनी ‘झिम्मा २’ लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन या, अशी मागणीही केली. त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी ‘झिम्मा २’चा निर्णय घेतला आणि आता लवकरच ‘झिम्मा २’ही सीमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे. या वेळी मजा डबल झाली असून हा चित्रपटही प्रेक्षक तितकाच एन्जॅाय करतील.’’

हेही वाचा : “तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन…” मराठी चित्रपटाचा शो रद्द केल्यानंतर हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद एल. राय आणि क्षिती जोग या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते आहेत विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ.