हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या कथेबरोबर त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. ‘झिम्मा २’ प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या आठवडाभराच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
हेही वाचा- “या सगळ्यांसमोर मी आपली इवलुशी, पण…”, रिंकू राजगुरूची ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘झिम्मा २’ २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ०.९५ कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १.७७ कोटीचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशी ‘झिम्मा २’ने २.०५ कोटींचा व्यवसाय केला. चौथ्या दिवशी चित्रपटाने ०.७५ कोटीची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी चित्रपटाने ०.५५ कोटींची कमाई केली होती. तर सहाव्या दिवशी ०.६९ कोटीचा गल्ला जमवला होता. सातव्या दिवशी चित्रपटाने ०.६५ कोटींची व्यवसाय केला आहे. आठवडाभरात चित्रपटाने एकूण ७.७१ कोटींची कमाई केली आहे.
‘झिम्मा २’ बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करीत आहेत. या चित्रपटाचे सगळेच शो हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ वाढताना दिसत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता, ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात धुमाकूळ घातल्यांतर ‘झिम्मा २’ आता परदेशांतही प्रदर्शित करण्यात येणार आहे. ओमान आणि बहारीन देशात या चित्रपटाचे शो आयोजित करण्यात आले आहेत. हेमंत ढोमेने याबाबत एक व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
हेही वाचा- “त्यांना अशीच उत्तरं…”, सिद्धार्थ चांदेकरने ट्रोलिंगबद्दल मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “जे लोक अपमान…”
‘झिम्मा २’ चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०२१ मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग ‘झिम्मा’ प्रदर्शित झाला होता. ‘झिम्मा’नेही बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.