हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा बहुचर्चित चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. झिम्मा २ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. शुक्रवारी २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक आणि कलाकार कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे.

‘झिम्मा २’ या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी एक कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आणखी वाचा : Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’

Paresh Mokashi, Prashant Damle as Hitler,
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत, परेश मोकाशी यांच्या मु. पो. बोंबिलवाडीला हिटलर सापडला
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
women in the theater started making strange gestures
चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…”
suraj chavan bigg boss marathi 5 winner
सूरज चव्हाण झाला अभिनेता! Bigg Boss संपताच पहिल्या चित्रपटाची लॉटरी; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, पाहा ट्रेलर
The AI dharma Story 25 October in cinemas
‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
kiran rao
ऑस्करमध्ये भारतीय महिलांचा जलवा; किरण रावच नव्हे, तर ‘या’ महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांनाही मिळाली होती एन्ट्री
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि

झिम्मा २ या चित्रपटाने गेल्या तीन दिवसात ४.७७ कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

या चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेने प्रतिक्रिया दिली आहे. प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत आहोत खूप ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आवर्जून भेटायला येत असून सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. प्रेक्षकांकडून ‘झिम्मा २’वर होणारा कौतुकाचा वर्षाव भारी फिलिंग देणारा आहे, असे हेमंत ढोमे म्हणाला.

आणखी वाचा : “कथा कशी मांडावी…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “मी लेखक नसल्याने…”

कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.