अभिनेत्री क्षिती जोगने आपल्या दमदार अभिनयाने मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमातून तिनं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ती ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. आज क्षितीचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. नवरा हेमंत ढोमेने तिला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – Video: “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं…”, म्हणत प्रसाद ओकने नवीन वर्षी दाखवली नव्या घराची झलक

अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने काही तासांपूर्वी क्षितीचा फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. क्षितीचा मनसोक्त हसतानाचा फोटो शेअर करत हेमंतने लिहिलं आहे, “या फोटोतलं हसू कायम असंच राहूदे…आपल्या लाईफची एनर्जी…जशी आहेस तशीच रहा, मालकीणबाई…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गेलं वर्ष तर तू गाजवलंस, असंच कमाल काम करत राहा…येणारं वर्ष सुद्धा तुला जे हवं ते देईल”

हेमंतच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टवर क्षितीला वाढदिवसाच्या शुभेच्छांसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीने दिला सुखद धक्का, साखरपुड्याचे फोटो शेअर करत म्हणाली, “आम्ही…”

दरम्यान, हेमंत ढोमे आणि क्षिती जोग ही जोडी मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी आहे. २०१२ साली दोघांनी लग्नगाठ बांधली होती. दोघांच्या सुखी संसाराला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.