मराठी कलाविश्वात हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधत आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्या सुखी संसाराला येत्या डिसेंबर महिन्यात १२ वर्षे पूर्ण होणार आहेत. हेमंत आपल्या लाडक्या बायकोला प्रेमाने पाटलीणबाई म्हणतो. दिग्दर्शकाने सोशल मीडियावर नुकताच पत्नीबरोबर एक खास फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेमंतने नुकताच क्षितीबरोबर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघांनीही पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळतात. जांभळी साडी, हातात हिरवा चुडा, नाकात नथ अशा मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्याच्या पाटलीणबाई अर्थात क्षिती एकदम सुंदर दिसत आहे. तर, हेमंतने यावेळी ऑफ व्हाइट रंगाचा सदरा अन् त्यावर लाल रंगाचं प्रिटेंट जॅकेट घातल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांच्या या गोड फोटोवर नेटकऱ्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु, सध्या या फोटोचं कॅप्शन सर्वाधिक चर्चेत आलं आहे.

हेही वाचा : कोकणात श्रीवर्धनला आहे प्रथमेश परबची सासुरवाडी! पत्नी क्षितीजाने शेअर केला ‘फॅमिली’ फोटो; म्हणाली, “लग्नानंतर…”

हेमंतने शेअर केलेल्या फोटोमध्ये क्षितीने पोज देताना पतीच्या पोटाकडे हात ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. यावरूनच अभिनेत्याने त्यांच्या फोटोला “पोटात बुक्का हानला तवा खळखळून हसले पाटील” असं जबरदस्त कॅप्शन दिलं आहे.

हेमंत ढोमे व क्षिती जोग यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर दोघांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली होती. त्याआधी दोघेही एकमेकांना ओळखत होते परंतु, त्यांच्यात मैत्री या नाटकाच्या निमित्ताने झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही याबद्दल घरच्यांना कल्पना दिली. दोन्ही कुटुंबांकडून हेमंत-क्षितीच्या नात्याला परवानगी मिळाल्यावर त्यांनी लगेच घरच्या घरी साखरपुडा केला आणि त्यानंतर वर्षभराच्या आत दोघांचं लग्न झालं.

हेही वाचा : दागिने, किराणा सामान अन् ‘इतक्या’ लाखांचा चेक…; अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळ्यात ५० गरीब जोडप्यांना काय-काय दिलं? जाणून घ्या…

दरम्यान, हेमंत ढोमेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ चित्रपटाचं दिग्दर्शन त्याने केलं होतं. तर, या चित्रपटात क्षितीने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हेमंत ढोमे आणि क्षिती जोगच्या ‘झिम्मा २’ चित्रपटाने दोन आठवड्यांमध्ये १० कोटींहून अधिक कमाई केली होती. यामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.