लोकप्रिय अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या सध्या ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, क्षिती जोग, निवेदिता सराफ, राजसी भावे, मिताली मयेकर, हरीश दुधाडे असे तगडे कलाकार मंडळी झळकले आहेत. याच चित्रपटाच्यानिमित्ताने हेमंत ढोमे ‘फसक्लास दाभाडे’मधील कलाकारांविषयी लिहिताना दिसत आहे. नुकतीच त्याने अमेय वाघसाठी खास पोस्ट लिहून शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेमंत ढोमेने अमेय वाघबरोबरचा जुना फोटो आणि ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिलं की, कंट्रोल नसणारे… ते कंट्रोल असणारे दोघे…२००६ साली म्हणजे बरोबर १८ वर्षांपूर्वी आपण दोघांनी एकत्र काम केलं होतं, ‘लूज कंट्रोल’ या आपल्या नाटकात आणि त्यानंतर आज ‘फसक्लास दाभाडे’ला आपण पुन्हा एकत्र आलो चित्रपटात…मधल्या काळात काय काय घडून गेलं… तुझा प्रचंड प्रेरणादायी करणारा प्रवास मी प्रेमाने आणि अभिमानाने बघत होतो.

पुढे हेमंत लिहिलं, “आपण जेव्हा जेव्हा एकत्र आलो तेव्हा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला… लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. आपण कंट्रोल लूज करून जे काही केलं ते फसक्लासंच केलं आणि लोकांना लक्षात राहिल असंच काम केलं.”

“अमुडी आता मधला १८ वर्षांचा काळ भरून काढायचा आहे, खूप काम करायचं आहे. तुझ्या कामातला अफाट प्रामाणिकपणा आणि माझी जिद्द या जोरावर आपण काहीतरी Constructive घडवू एवढं नक्की…माझ्या प्रेमळ, येड्या आणि तितक्याच निष्पाप सोनूला तू पडद्यावर साकारलंस आणि नुसतं साकारलं नाहीस तर ‘तोडलंस’ त्याबद्दल तुला घट्ट मिठी आणि खूप प्रेम. बाकी आता एकत्र राहायचं, मग सगळं होतंय आपोआप…तू सुपरस्टार आहेस आणि कायम राहणार. लव्ह यू,” अशी सुंदर पोस्ट हेमंत ढोमेने लिहिली आहे.

दरम्यान, याआधी हेमंत ढोमेने सिद्धार्थ चांदेकरसाठी खास पोस्ट लिहिलं होती. “दोन दोस्तांची हॅट्रिक…’झिम्मा’, ‘झिम्मा २’ आणि आता ‘फसक्लास दाभाडे’…आधी कबीर आणि आता किरण..माझा फेव्हरेट किरण दाभाडे… पण कबीर पण बिचारा छान होता… जाऊदे ना तूच माझा फेव्हरेट…प्रेक्षकांना तू आपलसं केलंस आणि प्रेक्षकांनी तुझ्यावर भरभरून प्रेम केलं…मी कंसातील वाक्य लिहायची आणि तू ती पडद्यावर दाखवायची, असंच काम करत राहू, बाकी काय होतंय की आपोआप…बाकी भेटून, बसून बोलूच…पण आपली हॅट्रिक सेलिब्रेट करूया,” असं सिद्धार्थ चांदेकरविषयी हेमंत ढोमेने लिहिलं होतं.