हेमंत ढोमे हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा उत्तम अभिनेता ते दिग्दर्शक हा प्रवास आपण सर्वांनीच पाहिला. त्याच्या ‘झिम्मा’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळाला. आता हेमंत ढोमे ‘डेट भेट’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता संतोष जुवेकर मुख्य भूमिका साकारणार आहे. नुकतीच या चित्रपटाची संपूर्ण टीमने ‘मॅजिक एफएम’च्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी हेमंत ढोमेने त्याच्या पहिल्या डेटबद्दल खुलासा केला.

हेही वाचा : “३६ व्या वर्षी चौथ्या प्रयत्नात…”, माही विजने सांगितला गरोदरपणातील अनुभव; म्हणाली, “एक बाळ गर्भातच…”

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”

हेमंत ढोमे म्हणाला, “मी युकेला मास्टर्स करत असताना माझ्यासमोर एक खूप सुंदर ४५ ते ५० वर्षांची बाई राहायची. मी माझ्या मित्रांना जी-मेल चॅटवरून ती खूप सुंदर दिसते वैगेरे सांगायचो. मी तेव्हा फक्त १९ ते २० वर्षांचा होतो. ख्रिसमसच्या संध्याकाळी त्या बाईने मला विचारले तुला आज वेळ असेल तर माझ्याघरी जेवायला येशील का? मी होकार कळवला, बाजारात जाऊन वाईनची बॉटल आणली तयार झालो आणि तिच्याकडे जेवायला गेलो.”

हेही वाचा : “Happy Birthday सुंदरी!”, क्रिती सेनॉनच्या वाढदिवसानिमित्त सई ताम्हणकरने शेअर केलेल्या फोटोची चर्चा

हेमंत पुढे म्हणालो, “आम्ही दोघेही एकत्र जेवलो. खूप गप्पा मारल्या आणि त्यानंतर बोलता-बोलता ती बाई मला म्हणाली, माझा मुलगा ऑस्ट्रेलियात असतो, तो अगदी तुझ्या वयाचा आहे. मला त्याची खूप आठवण येत होती. तू सुद्धा तुझ्या घरच्यांपासून दूर आहेस म्हणून मी तुला जेवायला बोलावून घेतले. त्या बाईंचे बोलणे ऐकून मी ढसाढसा रडलो, त्यांनी मला थोपटलं आणि मी माझ्या घरी आलो.”

हेही वाचा : “गेल्या ५ आठवड्यांपासून…”, ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली “हल्ली…”

“दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला शेवटी आई ही आईच असते… मग ती भारतातील असो किंवा इंग्लंडची याची जाणीव झाली. त्या दिवसापासून माझा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यानंतर मी कोणत्याच स्त्रीबद्दल कधीच मत बनवले नाही. त्या डेटमुळे मला खरंच खूप वेगळा आणि आयुष्यभर पुरेल असा अनुभव मिळाला.” असे हेमंतने सांगितले.

Story img Loader