अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता या तिन्ही भूमिका उत्तमरित्या पेलणारा कलाकार म्हणजे हेमंत ढोमे. ‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ यांसारखे दर्जेदार चित्रपट मराठी सिनेसृष्टीत हेमंतने दिले आहेत. आपल्या अभिनयाबरोबरचं तो चांगले विषय चित्रपटातून मांडताना दिसत आहे. आता लवकरच अभिनेता ‘झिम्मा २’नंतर नव्या चित्रपटाची घोषणा करणार आहे. यासंदर्भात हेमंत ढोमेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता हेमंत ढोमेने एक फोटो शेअर करत लिहिलं आहे, “उद्या होणार फसक्लास…हा फोटो आहे मी माझ्या गावाकडे गेल्यानंतर माझ्या माणसांनी केलेल्या सत्काराचा…त्या सगळ्यांचा माझ्यावर खूप जीव आहे आणि माझाही त्यांच्यावर…बोलता बोलता माझी भाषा तिथली होते आणि पण लगेच तिथला होतो…प्रचंड प्रेम, आपुलकी आणि खूप जास्त आदर हा मला माझ्या गावाविषयी लहानपणापासूनच होता म्हणजे सगळ्यांनाच असतो… पण मला जरा जास्तच आहे.”

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’ने निक्कीसाठी चहा बनवण्याचे आदेश देताच जान्हवी म्हणाली, “थोडी अक्कल किसून….”, नेमकं काय घडलं?

पुढे हेमंतने लिहिलं आहे, “मला कायम वाटायचं माझं गाव आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे…लहानपणी कुठे माहित होतं आपण मोठे झाल्यावर दिग्दर्शक होऊ, निर्माता होऊ? पण आता माझा सातवा चित्रपट लिहिताना, दिग्दर्शित करताना आणि माझी व क्षितीची म्हणजे आपल्या चलचित्र मंडळीची चौथी निर्मिती असताना मी-क्षितीने मनाशी ठरवलं होतं हा चित्रपट आपल्या गावीच बनवायचा… आपल्या भागातले लोक घेऊन आपल्या भागातच चित्रीत करायचा…गंमत बघा माझ्या लाडक्या टिमबरोबर आम्हाला आपला हा चित्रपट स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत शूट करता आला…लय भारी वाटलं राव…”

“आता तो पूर्ण झालाय आणि लवकरच तुमच्या भेटीला येतोय… कधी, कसा ते सगळं उद्या सांगतोच…पण माझ्या अत्यंत जवळचा विषय… मी जे जगलो, जे पाहिलं अनुभवलं ते सगळं मांडायचा प्रयत्न केलाय… हळू हळू पुढच्या कथांमधून सुद्धा मांडत राहिनच…तर मंडळी माझ्या मातीचा अभिमान आता तुम्हा सगळ्यांना हक्काने सांगायचाय…कोणीतरी म्हणलेलच आहे, “सिनेमाचा विषय जेव्हा लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या अत्यंत जवळचा असतो तेव्हा तो प्रेक्षकांच्याही खूप जवळचा होतो.” तर आता वेळ आलीय हे तपासून बघण्याची…तुमच्यासमोर हक्काने पुन्हा एकदा थोडसं चाचपडायची…तर उद्या सग्गळं “फसक्लास” होणार,” असं हेमंतने लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील पुर्णिमा तळवलकरांचा भाचीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – रिअ‍ॅलिटी शोमुळे स्पर्धकांनी केल्या होत्या आत्महत्या! त्यागराज खाडिलकरचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…

दरम्यान, हेमंत ढोमेच्या या पोस्टवर इतर कलाकर मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “एकदम ‘फसक्लास’ शुभेच्छा पाटील”, “खूप खूप शुभेच्छा पाटील”, “व्वा पाटील”, अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया हेमंतच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemant dhome will soon announce a new marathi movie pps