एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर ती वेळ योग्य नसेल तर त्या मृत व्यक्तीच्या पाठोपाठ कुटुंबातील किंवा जवळच्या ५ व्यक्तींचं निधन होतं ही समज म्हणजे ‘पंचक’. या पंचकच्या भीतीपोटी कोकणातील एका कुटुंबात घडणाऱ्या घटना आणि गोंधळ केंद्रस्थानी ठेवत विनोदी, खुसखुशीत गोष्ट सांगणारा ‘पंचक’ हा चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. आता पुढचा नंबर कोणाचा? या भीतीखाली वावरणाऱ्या कुटुंबाची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित- नेने आणि डॉ. श्रीराम नेने या पती-पत्नीने केली आहे. नव्या-जुन्या ताकदीच्या कलाकारांची फौज या चित्रपटात असून जयंत जठार आणि राहुल आवटे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. ‘पंचक’ या गमतीशीर भीतीदायक चित्रपटाच्या गमतीजमती दिग्दर्शक जयंत जठार आणि राहुल आवटे यांच्याबरोबर आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, सागर तळाशीकर, तेजश्री प्रधान, दीप्ती देवी, आरती वडगबाळकर या कलाकारांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान सांगितल्या.  

हेही वाचा >>> Video : मृण्मयी देशपांडेच्या लाडक्या बहिणीचं लग्न! गौतमीच्या हातावर रंगली स्वानंदच्या नावाची मेहंदी, पाहा झलक

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो

‘पंचक’ या चित्रपटाची कल्पना कशी सुचली याबद्दलचा किस्सा दिग्दर्शक राहुल आवटे यांनी सांगितला. ‘जयंतच्या घरी असा प्रसंग सुरू होता आणि तेव्हा त्याने माझ्याकडे या ‘पंचक’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रथेचा उल्लेख केला. त्याच्या घरी जे घडत होतं ते गंभीर होतं, पण तो ते सांगत असताना मला सुरुवातीला थोडं गमतीशीर वाटलं. त्याची त्या मागची भीती काय आहे हे समजत गेलं तसं अशा भीतीतून साधारण घराघरांत काय गोष्टी घडतात याचा विचार करत जाता त्यातली गंमत वा विसंगती लक्षात येत गेली. हा प्रकार काहीसा चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटांसारखा आहे. एखाद्या प्रसंगात तो त्याला त्याच्या घरी खाण्यासाठी काही नाही आहे हे दाखवून देतो. पण त्याच्या विनोदी हावभावातून ते दाखवत असताना काहीतरी वस्तू हातात घेऊन ते खाण्याचं नाटक करत आपलं दु:ख शमवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पडद्यावरच्या त्याच्या विनोदी अभिनयामुळे आपण हसत असतो, पण प्रत्यक्षात गमतीने का होईना खऱ्या आयुष्यात त्याच्यावर किती वाईट परिस्थिती ओढवली आहे हे त्याने दाखवलेलं असतं. तसाच काहीसा विचार ‘पंचक’ करताना आम्ही केला आहे. वरवर बघताना गमतीशीर वाटणाऱ्या या घरातले सगळे सदस्य घाबरले आहेत आणि त्यांच्या भीतीचं एका क्षणी विनोदात कसं रूपांतर होतं, एका टप्प्यानंतर आपल्यालाच आपली भीती कशी क्षुल्लक वाटू लागते याचं चित्रण आम्ही या चित्रपटात केलं आहे’ अशा शब्दांत सविस्तर कथाकल्पना राहुल यांनी सांगितली.  

एकत्र कुटुंबपद्धतीची गंमत ‘पंचक’ या चित्रटात एकत्र कुटुंबाची गोष्ट जाणीवपूर्वक दाखवण्यात आली आहे असं दिग्दर्शक जयंत जठार यांनी सांगितलं. ‘चित्रपट करताना आपल्या मातीतली, आपल्या आजूबाजूला घडणारी गोष्ट आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती. या चित्रपटात तीन पिढयांचे सदस्य एकत्र वावरत आहेत. मी दिग्दर्शक म्हणून माझ्या मुळांपासून, माझ्या माणसांच्या गोष्टींपासून लांब गेलो तर माझा चित्रपट पाहायला येणारा प्रेक्षक देखील त्या गोष्टीशी स्वत:ला जोडून घेऊ शकणार नाही. मुळात या चित्रपटाच्या गोष्टीची गरज आहे म्हणून आम्ही तीन पिढया असलेलं कुटुंब दाखवलं आहे. ही एक बाजू असली तरी अजूनही कोकणात अगदी मुंबईतही दिवाळी, गणेशोत्सवासारख्या सणाला कुटुंबं एकत्र येतात, एकमेकांशी जोडलं जाण्याची, सुखदु:खात एकत्र साथ देण्याची भावना प्रत्येकात असते, ती या कथेतूनही अधोरेखित झालेली आहे’ असं जयंत यांनी सांगितलं.  

या चित्रपटाबद्दल आणि व्यक्तिरेखेबद्दल आदिनाथ कोठारे म्हणाला, ‘मी माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्या निर्मितीसंस्थेच्या पहिल्या मराठी चित्रपटात ‘१५ ऑगस्ट’ मध्ये काम केलं होतं. त्या चित्रपटातलं माझं काम त्यांना आवडलं होतं, त्यामुळे त्यांनी मला पुन्हा या चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं याबद्दल मी खूप आनंदी आहे.  चित्रपटात मी दिलीप प्रभावळकरांच्या मुलाची भूमिका साकारतो आहे. त्याचा या ‘पंचक’ लागणे वगैरे गोष्टींवर मुळात विश्वास नसतो आणि असं काही नसतं हे त्याच्या कुटुंबाला सांगण्याचा प्रयत्न करण्यातच त्याची शक्ती खर्ची होत असते. या चित्रपटाची एकूणच कथा आणि उत्तम कलाकारांबरोबर काम करण्याची संधी या दोन्ही गोष्टींमुळे ‘पंचक’चा भाग होता आलं याबद्दल आनंद वाटतो’. 

हेही वाचा >>> मुहूर्त ठरला, मंडप सजला! स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीच्या घरी लगीनघाई, शेअर केला मेहंदी सोहळ्यातील फोटो

या चित्रपटाची निर्माती म्हणून माधुरी दीक्षित यांच्याबरोबर काम करताना आलेला अनुभव सांगताना अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली, ‘मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते चित्रपट करायला घाबरतात. अशा परिस्थितीत हिंदीतला फार मोठा आणि यशस्वी चेहरा असलेल्या अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी निर्माती म्हणून मराठी चित्रपटच करायचा हा निर्धार केला. ‘पंचक’ हा चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित झाला पाहिजे यासाठी त्या आग्रही होत्या. ग्रामीण लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला पाहिजे ही त्यांची इच्छा आहे. म्’ून त्या ओटीटीसारखा सुरक्षित पर्याय उपलब्ध असतानाही चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यावर भर देत आहेत. आपली भाषा आणि आपल्या कलेबद्दलचा जिव्हाळा त्यांच्यात नेहमी दिसून येतो’.  

मराठी चित्रपटांना कमी शो दिले जातात, याबद्दल मत मांडताना अभिनेता आनंद इंगळे यांनी सांगितले, ‘मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन फक्त मराठी चित्रपट पाहत असते तर कितीही हिंदी मोठा चित्रपट प्रदर्शित झाला तरी मराठी चित्रपटांचे शो कमी होणार नाहीत. कारण शो मिळाले तरी प्रेक्षक कुठून आणणार? हा प्रश्न मराठी चित्रपटांसोर असतो.

शेवटी चित्रपट हा व्यवसाय असल्याने चित्रपटगृह व्यावसायिकांचा भर प्रेक्षकसंख्येवरच असणार’. त्यामुळे चांगल्या संहितेवर भर दिला तरच मराठी प्रेक्षकांचा मराठी चित्रपट पाहण्याकडे कल वाढेल हेही खरं आहे आणि प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहात येणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असं आनंद इंगळे यांनी सांगितलं.    मराठी आणि हिंदी भाषेची देवनागरी ही एकच लिपी आहे, मराठी प्रेक्षकांना हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा पटकन समजतात. त्यामुळे ते हिंदी चित्रपटही आवर्जून पाहतात. पण, तमिळ किंवा अन्य दाक्षिणात्य भाषेतील प्रेक्षकांना हिंदी भाषा समजणं फारच कठीण असतं. त्यामुळे ते त्यांच्या भाषेतील चित्रपट अधिक पाहतात. मराठी प्रेक्षकांचं विभागलं जाणं हे अशा विविध कारणांमुळे असल्याकडे अभिनेते सागर तळाशीकर यांनी लक्ष वेधलं. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशी त्यांच्या जिव्हाळयाची, त्यांच्या संस्कृतीतली गोष्ट मांडण्यावरच भर द्यायला हवा आणि तशाच पद्धतीचे मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांसमोर येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Story img Loader