राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज राहुल यांचे श्रोते मोठ्या प्रमाणात आहेत. राहुल यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचे श्रोते आवर्जुन उपस्थित राहत असतात. त्यांच्या आवाजाचे जितके चाहते आहेत, तितकेच त्यांच्या अभिनयाचे देखील चाहते झाले आहेत. ‘मी वसंतराव’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली वसंतराव देशपांडे यांची भूमिकेने प्रेक्षकांची अक्षरशः मनं जिंकली आहेत. असे लोकप्रिय गायक, अभिनेते राहुल देशपांडे एका शोचे किती पैसे घेतात? हे माहितीये का? याविषयी ते नुकतेच बोलले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. ते नेहमी त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात काय नवीन सुरू आहे याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी सेशन’द्वारे चाहत्यांबरोबर संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. तरीही चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राहुल यांनी दिलं. आवडीच्या खेळापासून ते कॉन्सर्टपर्यंत असे अनेक प्रश्न विचारले.

हेही वाचा – वैजयंती माला यांना पद्म विभूषण जाहीर झाल्यावर हेमा मालिनी यांची खास पोस्ट, म्हणाल्या, “माझ्यासाठी हा दिवस…”

इन्स्टाग्रामवरील या ‘आस्क मी सेशन’मध्ये एका चाहत्याने त्यांना विचारलं की, सर एका शोचे पैसे किती घेता? यावेळी राहुल देशपांडे यांनी खूप जबरदस्त उत्तर चाहत्याला दिलं. ते म्हणाला, “हा प्रश्न थोडा कानसूर वाटतो. व्हायोलिन राजस यांच्याशी संपर्क साधा.”

हेही वाचा – Video: शाळेची सफाई करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर करत जितेंद्र जोशीने प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला…

दरम्यान, राहुल देशपांडे यांनी ‘मी वसंतराव’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याबरोबरच संगीत दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much do you charge for a show rahul deshpande replied to a fan question pps
Show comments