अभिनेते हृषिकेश जोशी(Hrishikesh Joshi) हे चित्रपट, नाटक आणि वेब सीरिज या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता त्यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चनची आठवण सांगितली आहे.

काय म्हणाले हृषिकेश जोशी?

अभिनेते हृषिकेश जोशी यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची आठवण सांगितली आहे. हृषिकेश जोशी यांनी म्हटले, “अभिषेक बच्चनबरोबर ‘ब्रीद’ या सीरिजमध्ये साधारण तीन वर्षे एकत्र काम केले. त्यामुळे त्याच्याशी माझी उत्तम मैत्री आहे. एकदा मी शूटिंगसाठी गेलो असताना फोनवर खूप वेळ बोलत होतो. अभिषेकनं ते बघितलं आणि त्यानं मस्करी करीत दिग्दर्शकाला सांगायला सुरुवात केली. बघ, तुझा कलाकार एक तासापासून फोनवर बोलतोय. माझा एक पत्रकार मित्र मला अमिताभ बच्चनसाहेबांच्या करिअरची ५० वर्षे झाली म्हणून लेख लिही, असा आग्रह करीत होता. पण, माझे आधीच शूट सुरू असल्याने मला लिहीत बसणे शक्य नव्हते. मग तो म्हणाला की, तू बोल मी शब्दांकन करतो. मी त्याला म्हटलं की, तू कर शब्दांकन; पण पूर्ण झाल्यावर मला पाठव. मी तपासतो. कारण- त्यात काही घोळ नको. त्यामुळे मी इतका वेळ फोनवर बोलत होतो. मी फोनवर बोलून परत आल्यावर अभिषेक माझ्यासमोर उभा राहिला. मी त्याला म्हटलं, ‘सर, तुमचे वडील अमिताभ बच्चन यांच्या करिअरला ५० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल एक आर्टिकल येत आहे.’ त्याला वाटलं सुटका करून घेण्यासाठी मी थाप मारली. त्याला ते पटेना.”

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य

हेही वाचा: Video: शूट करत असताना अचानक प्रसिद्ध गायिकेवर पडला सेट अन् मग…; व्हिडीओ झाला व्हायरल

पुढे बोलताना हृषिकेश जोशी म्हणतात, “दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र आलं. त्याला मी त्यातील लेख दाखवला आणि सांगितलं काल हे चाललं होतं. त्याला आनंद झाला. मला व्हॅनिटीमध्ये बोलवलं आणि म्हणाला की, मला या पेपरची एक कॉपी मिळू शकते का? मी वडिलांना देतो. मी म्हटलं की, हे मराठीमध्ये आहे. त्यावर त्यानं म्हटलं की, ते दररोज मराठी वाचतात. त्यानं तो लेख आणि माझ्याबरोबर फोटो काढून घेतला. मला नंतर सांगितलं की, वडिलांना तो लेख आवडला. यापेक्षा काय जास्त पाहिजे. सेटवर आम्ही खूप गप्पा मारायचो. अभिषेककडून अनेक किस्से ऐकले आहेत. आम्हाला दोघांनाही गोड खूप आवडतं. तो रोज गोड काहीतरी खायला आणायचा. एकपण दिवस असा नाही की, त्यानं माझ्यासाठी खायला आणलं नाही.”

दरम्यान, हृषिकेश जोशी लवकरच ‘फुलवंती’ या चित्रपटात दिसणार आहेत.

Story img Loader