ऋता दुर्गुळे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. छोट्या पडद्यावरील ‘दुर्वा’ या मालिकेमुळे ऋता प्रसिद्धीझोतात आली. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये अभिनेत्रीने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. वैयक्तिक आयुष्यात ऋताने १८ मे २०२२ रोजी लोकप्रिय दिग्दर्शक प्रतीक शाहबरोबर लग्नगाठ बांधली. अलीकडेच अभिनेत्री तिच्या नवऱ्यासह मालदिव फिरायला गेली आहे. ऋताचे मालदिव ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : संजय लीला भन्साळींच्या बहुचर्चित ‘बैजु बावरा’मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी? रणवीर-आलियासह पहिल्यांदाच करणार काम

लग्नानंतर ऋता आणि प्रतीक नेहमीच विविध ठिकाणी फिरायला जात असतात. सध्या अभिनेत्री सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पतीसह मालदिवला गेली आहे. ऋताच्या मालदिवच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : टोलबद्दल प्रश्न विचारणाऱ्या तेजस्विनी पंडितच्या सोशल अकाउंटवर कारवाई; संताप व्यक्त करत म्हणाली, “या बंदीने माझा…”

मालदिवमध्ये असंख्य अलिशान रिसॉर्ट्स आहेत. त्यापैकी Sun Siyam Irufushi Beach Resort and Spa या रिसॉर्टमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अभिनेत्री गेली होती. हे रिसॉर्ट दिसायला अतिशय सुंदर आणि प्रशस्त आहे. स्वच्छ निळेशार पाणी, पांढरी शुभ्र वाळू, विविध वॉटर स्पोर्ट्स यामुळे दरवर्षी बहुतांश पर्यटक मालदिवला भेट देतात.

ऋता दुर्गुळेने सन सियाम इरुफुशी बीच रिसॉर्टमधून अनेक फोटो शेअर केले आहेत. माले विमानतळापासून या रिसॉर्टला जाण्यासाठी पर्यटकांना एकूण ४५ मिनिटं लागतात. या रिसॉर्टमधील सगळ्या खोल्यांमध्ये पर्यटकांना अत्याधुनिक सेवा देण्यात आल्या आहेत. या रिसॉर्टमधील एका रुमचं भाडं प्रतिदिवस कमीत कमी ४६ हजार ते जास्तीत जास्त दीड लाखांपर्यंत आहे. तसेच साध्या वॉटर व्हिलाचं प्रतिदिवस भाडं ५३ हजारांपासून सुरु होतं. लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्या, विशेष ऑफर्सनुसार हे दर कमी-जास्त होऊ शकतात.

हेही वाचा : “माझा आगाऊपणा…”, सोहम बांदेकरने आईला दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला “आम्हाला तुझे फोटो…”

दरम्यान, ऋताच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची सर्किट चित्रपटात दिसली होती. छोट्या पडद्यावरील ‘दुर्वा’, ‘फुलपाखरु’, ‘मन उडू उडू झालं’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता तर मालिकांमधून ब्रेक घेत ऋता मराठी चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hruta durgule enjoying holiday in maldives know the rent of exotic resort for one day sva 00