महाराष्ट्राची क्रश अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे ‘सर्किट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘सर्किट’ चित्रपटाच्या निमित्ताने ऋताने अनेक माधम्यांना मुलाखती दिल्या. या मुलाखतीदरम्यान ऋताने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरबरोबर रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सर्किट’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या ऋता दुर्गुळे व वैभव तत्ववादीने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत वैभवला कोणत्या अभिनेत्रीबरोबर तर ऋताला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याबरोबर रोमान्स करायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत वैभव म्हणाला, “पूजा सावंत व मला प्रेक्षकांनी ऑन स्क्रीन रोमँटिक जोडी म्हणून पसंती दर्शविली. तर माझी व प्रार्थना बेहेरेची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते.”

हेही वाचा>> प्रियांका चोप्राच्या घरी छापेमारी झाल्यावर टॉवेलमध्ये असलेल्या शाहीद कपूरने उघडलेला दरवाजा अन्…; अभिनेत्री सत्य सांगत म्हणालेली…

बॉलिवूडमध्ये कोणत्या अभिनेत्याबरोबर काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारल्यावर ऋताने “वरुण धवनबरोबर काम करायला आवडेल,” असं सांगितलं. तर कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याबरोबर रोमान्स करायला आवडेल? या प्रश्नाचं उत्तर देताना तिने रणबीर कपूरचं नाव घेतलं. ऋता म्हणाली, “ऑन स्क्रीन रोमान्स याकडे मी कामाच्या दृष्टीकोनातून पाहते. मला रणबीर कपूरबरोबर डोळ्यांतून रोमान्स करायला आवडेल. त्याचे डोळे खूप सुंदर आहेत. शारीरिकपेक्षा मला डोळ्यांतून प्रेम व्यक्त करायला आवडतं.”

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला, “बाबासाहेब…”

दरम्यान, ऋता दुर्गुळे व वैभव तत्ववादी यांचा ‘सर्किट’ हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. आकाश पेंढारकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून मधूर भांडाकरांची निर्मिती आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे व रमेश परदेशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hruta durgule said she would like to do romantic scene with bollywood actor ranbir kapoor circuitt movie kak