मराठीमधील तरुण अभिनेत्रींमध्ये ऋता दुर्गुळेचं नाव आवर्जुन घेतलं जातं. ऋताचा इथवरचा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. विविध मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत तिने प्रेक्षकांना आपलंस केलं. मराठी मालिकांनी तिला खरी ओळख मिळवून दिली. ‘दुर्वा’, ‘फुलपाखरु’, ‘मन उडू उडू झालं’ अशा मालिकांमध्ये तिने काम केलं. ऋता अगदी सामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे.

ऋताचा काही दिवसांपूर्वीच ‘सर्किट’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे ती सध्या बरीच चर्चेत आहे. ऋताने अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. ऋता तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये नेमकी कशी आहे? तिचं कुटुंब कसं आहे? याबाबत तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं.

annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
person from a middle class family built a company worth crores
Success Story : पैसा आणि ओळख नाही… केवळ मेहनतीच्या जोरावर मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीने उभी केली करोडोंची कंपनी
We celebrate Teachers Day but when will we do deep teacher training
आपण शिक्षक दिन साजरे करतो, पण प्रगल्भ शिक्षकनिर्मिती कधी करणार?
Patangrao Kadam memorial site will be inaugurated tomorrow print politics news
डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळाचे उद्या लोकार्पण; राहुल गांधी यांची उपस्थिती
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन
Raj Thackeray, gadchiroli, Maha vikas Aghadi,
“लोकसभेत महाविकास आघाडीला कौल, कारण…” काय म्हणाले राज ठाकरे?

आणखी वाचा – अक्षया देवधरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुयश टिळकची झाली होती अशी अवस्था, खुलासा करत म्हणाला, “त्या परिस्थितीत…”

सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात ऋताला तिच्या कुटुंबियांबाबत तसेच बालपणाविषयी विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “आम्ही आधी लालबागमध्ये राहत होतो. एकत्रित कुटुंबामध्येच माझा जन्म झाला आहे. आमचं आधी एकत्रित कुटुंब होतं. माझं बालपण खूपच छान होतं”.

आणखी वाचा – “तिच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आलं आणि…” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत सुयश टिळकचं भाष्य, म्हणाला, “आजही आमच्यामध्ये…”

“मला लहान भाऊ आहे. त्याचं नाव रुग्वेद. तो कलाक्षेत्रामध्येच कार्यरत आहे. पण प्रॉडक्शनमध्ये तो काम करतो. बॉलिवूड, जाहिराती, ओटीटीचं तो काम पाहतो. माझे बाबा व्यावसायिक आहेत. ऊसाचा रस काढण्याची मशिन बनवण्याची आमची फॅक्ट्री आहे. माझ्या पंजोबांपासून आमचा हा व्यवसाय सुरू आहे. आई ही एक गृहिणी आहे. पण गृहिणी म्हणूनही काम करणं किती कष्टाचं आहे हे मला माझं लग्न झाल्यानंतर कळालं”. ऋताचा आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास खरंच उल्लेखनीय आहे.