गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ऋता दुर्गुळे व वैभव तत्त्ववादीच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या निमित्ताने ऋता व वैभव ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे. या दोघांचा चित्रपट नेमका कोणता? असा प्रश्न प्रेक्षकांनाही पडला होता. अखेरीस चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वैभवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्यवसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…”

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले

ऋता व वैभवच्या चित्रपटाचं नाव ‘सर्किट’ असं आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये ऋता व वैभवमध्ये कमाल केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर या दोघांच्या किसिंग सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेम, रोमान्स, अ‍ॅक्शनचा भरणा असलेला हा टीझर आहे.

पाहा टीझर

तसेच मराठीमधील हा एक थ्रीलर चित्रपट असल्याचं टीझरमधून दिसून येत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आकाश पेंढरकर यांनी केले आहे. तर मधुर भंडारकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटामध्ये ऋता व वैभवच्या लव्हस्टोरीमध्ये एक ट्वीस्ट येतो पण त्यानंतर नेमकं काय घडतं? हे ‘सर्किट’मध्ये पाहायला मिळेल.

आणखी वाचा – सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “काही दिवसांपूर्वीच…”

पण या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर अनेकांनी याची तुलना दाक्षिणात्य चित्रपटाशी केली आहे. हा चित्रपट म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे असं काही प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे. तर काहींनी या टीझरचं कौतुक केलं आहे. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये ‘सर्किट’बाबत उत्सुकता वाढवली आहे.

Story img Loader