‘अथांग’ नावाची एक मराठी वेब सीरिज प्लॅनेट मराठी या ओटीटीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत या वेब सीरिजची निर्माती आहे. आज सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने राज ठाकरे यांची छोटेखानी मुलाखत घेतली आणि काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची राज यांनी मोकळेपणाने उत्तरं दिली. यावेळी त्यांनी मनसेकडून मराठी चित्रपटांबाबत घेण्यात येणाऱ्या भूमिकांबद्दलही भाष्य केलं.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी सीरिजवाला माणूस नाही. पण मी २-४ सीरिज आतापर्यंत पाहिल्यात. ‘अथांग’ सीरिजही बघणार आहे. मी फिल्मवाला माणूस आहे. २-३ तासांत जे काही सांगायचं ते सांगून द्या. खरं तर मी एकटाच मराठी माणसाच्या पाठीमागे उभा आहे, असं नाही. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतो. माझ्या घरात मला आजोबा, वडील किंवा काकांपासून जे संस्कार मिळाले, त्यामुळे मी अत्यंत हार्डकोअर, कट्टर मराठी आहे. त्यामुळे मला जिथे शक्य असतं तिथे तिथे मी मराठी माणसांसाठी उभा राहतो. मी कोणावरही उपकार करत नाही. मला शक्य असेल तितकं माझं कर्तव्य पार पडण्याचा प्रयत्न करतो,” असं भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

आवडती वेब सीरिज कोणती? राज ठाकरे म्हणाले, “मी इतक्या…”

राज ठाकरेंनी याठिकाणी बोलताना वेब सीरिजच्या सेन्सॉरशिपबद्दलही मत नोंदवलं. ते म्हणाले, सीरिजमध्ये तुम्ही काय दाखवणार आहात, हे महत्त्वाचं असतं. काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राने एक सीरिज लावली होती. त्यात फक्त व्याकरणापुरतं मराठी होतं. बाकी बऱ्याचशा शिव्या होत्या. किती शिव्या द्यायच्या, यालाही मर्यादा असावी. आपण परदेशातील अनेक गोष्टींचं अनुकरण करतो, पण इतक्या वर्षांनंतरही आपल्याकडे लोकशाही रुजायची आहे. मोकळेपणा नक्कीच यायला हवा, पण ती सीरिज किंवा चित्रपटांची गरज असावी. गरज असताना तिथे कोणतीही बंधनं नसावी, असंही राज ठाकरे म्हणाले.

Story img Loader