अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २४१ धावा केल्या होत्या. परंतु, ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडच्या दमदार शतकाच्या जोरावर हे लक्ष्य सहज पार केले आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. टीम इंडियाचा पराभव झाल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
मराठी मनोरंजन विश्वातील काही आघाडींच्या कलाकारांनी टीम इंडियाच्या पराभवावर नाराजी व्यक्त केली आहे. काही कलाकारांनी टिव्ही बंद केले, तर काही जणांनी इन्स्टाग्रामवर भावुक इमोजी शेअर केले आहेत.
हेही वाचा : “बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली,” फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट
अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट शेअर करत “हा ऑस्ट्रेलियाचा हेड (ट्रेव्हिस हेड )आता माझ्या हेडमध्ये जातोय” असं म्हटलं आहे. तसेच प्रिया बापट आणि सई ताम्हणकर यांनी भावुक होत इन्स्टाग्रामवर स्टोरीवर रडण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
अभिनेता अमेय वाघने “छोडो यार कालापानी देखो! त्यामध्ये कोणीच नाही हरत अशी पोस्ट शेअर केली आहे.” ‘कालापानी’ ही वेबसीरिज असून त्यामध्ये अमेयने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा : Miss universe 2023 : मिस युनिव्हर्स २०२३ किताब पटकावणारी शेनिस पॅलासिओस नक्की आहे तरी कोण?
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलने “काही झालं तरीही आम्ही सदैव टीम इंडियाबरोबर आहोत” अशी पोस्ट शेअर केली आहे.
याशिवाय ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरीने “चला TV बंद करतेय” अशी पोस्ट शेअर केली आहे.