Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians : सध्या देशभरात IPL च्या १७ व्या हंगामाची जोरदार चर्चा चालू आहे. बुधवारी यंदाची आठवी लढत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन संघात झाली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २७७ धावांचा डोंगर उभा केला होता. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. मुंबईला प्रत्युत्तरात २० षटकांमध्ये केवळ २४६ धावा करता आल्या आणि मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी या हंगामातील सलग दुसरा पराभव झाला.
मुंबईचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्याने सध्या मुंबई इंडियन्सच्या समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहेत. याशिवाय गुणतालिकेत मुंबई संघ नवव्या स्थानावर घसरला आहे. या पराभवानंतर काही माजी क्रिकेटपटूंनी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याशिवाय या सामन्याबाबत एका मराठी अभिनेत्रीने देखील पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : चार वर्षांनी भारतात परतली मृणाल दुसानिस; ‘तू तिथे मी’ मधील लाडक्या मैत्रिणीची घेतली भेट, फोटो आला समोर
‘मला सासू हवी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या दीप्ती देवीने खास पोस्ट शेअर करत हैदराबाद संघाचं कौतुक केलं आहे. हैदराबादच्या संघाने उभारलेली विक्रमी धावसंख्या पाहून दीप्ती लिहिते, “सूर्य उगवतोय? नाही…सूर्य तळपतोय, सनरायझर्स हैदराबाद हा खरा खेळ आहे. न भूतो न भविष्यति…IPL 2024”
हेही वाचा : लेकीच्या लग्नात आईला अश्रू अनावर अन् बाबा…; पूजा सावंतच्या लग्नाला १ महिना पूर्ण! शेअर केला खास व्हिडीओ
दीप्तीने याआधी मुंबईच्या पहिल्या पराभवानंतर देखील कर्णधार पंड्यासाठी एक पोस्ट लिहिली होती. “भाई पंड्या, तू दिल से अभी तक गुजरात के साथ ही है” असं तिने या पोस्टद्वारे म्हटलं होतं. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली होती. दरम्यान, पाच वेळा IPL जिंकलेल्या संघाला सलग दुसरा पराभव पत्कारावा लागल्याने सोशल मीडियावर देखील मीम्सचा पाऊस पाहायला मिळत आहे.
दीप्ती देवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पंचक’ व ‘नाळ’ या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.